Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआरकेवरील यशवंत मंडई फेब्रुवारीत होणार जमीनदोस्त; 'हे' आहे कारण

आरकेवरील यशवंत मंडई फेब्रुवारीत होणार जमीनदोस्त; ‘हे’ आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्टसिटीकडे वाटचाल करणार्‍या नाशिकची (Nashik) पार्किंगची समस्या भयावह होऊ लागलेली आहे. शहरात पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी मनपाच्या मालकीची रविवार कारंजावरील पन्नास वर्षे जुनी यशवंत मंडईची (Yashwant Mandai) जीर्ण इमारत फेब्रुवारीत जमीनदोस्त करून याठिकाणी मनपा बहुमजली पार्किंग उभारणार आहे…

- Advertisement -

येथील भाडेकरूंनी ही इमारत सोडण्यास नकार दिला होता. पण करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर येथील दुकानदारांनी गाळे खाली करण्याची तयारी दर्शवली. तसेच  येथे असलेल्या युको बँक शाखाही (UCO Bank Branch) दुसरीकडे स्थलांतरित होणार आहे. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात धोकादायक जीर्ण इमारत जमीनदोस्त केली जाईल.

सुरुवातीला यशवंत मंडईतील भाडेकरूंना इमारत रिकामी करा, अशा नोटिसा मनपाने (NMC) धाडल्या होत्या, पण भाडेकरूंनी आक्षेप घेत इमारत भक्कम असल्याचा अजब दावा करीत  ही जागा सोडायची नसल्याने भाडेकरूंचा (Tenant) खटाटोप सुरू आहे. तो पाहता मनपा करसंकलन विभागाने इमारत भक्कम असल्याचे पुरावे देण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर आडमुठेपणाची भूमिका घेणारे येथील दुकानदार बॅक फुटवर आले व जागा खाली करण्यास सहमती दिली.

तसेच येथे युको बँकेची शाखा आहे. त्यांनीदेखील दुसरी जागा शोधली आहे. त्यामुळे ही धोकेदायक इमारत पाडली जाणार असून, येथे बहुमजली पार्किंग उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील मध्यवर्ती समस्या डोकेदुखी त्यामुळे मनपा कारंजावरील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अगोदर स्मार्टसिटी ही पार्किंग उभारणार होती, त्यांनी हा प्रकल्प रद्द केल्याने आता मनपा याच जागेवर बहूमजली पार्किंग उभारणार आहे. यशवंत मंडईची इमारत जुनी असून, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यशवंत मंडईतील भाडेकरूंनी इमारत सक्षम असल्याचा दावा फोल ठरल्याने  त्यांनी गाळे खाली करण्याची तयारी दर्शवली आहे.येत्या फेब्रुवारीत ही जीर्ण झालेली इमारत पाडली जाईल.

– श्रीकांत पवार, उपायुक्त, कर विभाग.

- Advertisment -

ताज्या बातम्या