Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाअंडर १९ वर्ल्डकपसाठी भारताचे नेतृत्व यश धुलकडे

अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारताचे नेतृत्व यश धुलकडे

मुंबई | Mumbai

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी (ICC Under-19 World Cup Cricket Tournament) बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा (Announcement of Indian team) केली आहे…

- Advertisement -

भारतीय संघाने १४ मोसमांमध्ये ४ वेळा विश्वचषक पटकावला आहे. तर २ वेळा भारताला उपविजेतेपद पटकावण्यात यश मिळाले आहे. यंदा भारतीय संघाचे कर्णधारपद दिल्लीच्या यश धुलच्या खांदयावर सोपवण्यात आले आहे.

आता धुलच्या नेतृत्वात स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयच्या ऑल इंडिया ज्युनियर सिलेक्शन कमीटीने भारताच्या १७ सदस्सीय संघाची घोषणा केली आहे.

१४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण १६ संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सहभागी होणार आहेत. यावेळीही स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघांमध्ये भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.

स्पर्धेचे आयोजन विंडीजमध्ये करण्यात येणार आहे. भारताचा सलामी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गयाना स्टेडियमवर होणार आहे. एकूण ४८ सामने स्पर्धेत खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण ४ गट करण्यात आले असून, प्रत्येक गटात ४ संघाचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ

यश धूल, हरनूरसिंग, अंगक्रिश रघुवंशी, एस. के. रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बना (यष्टीरक्षक), आराध्य यादा, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर. एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओशटवाल, रवीकुमार गर्व सांगवान.

राखीव खेळाडू

रिषीत रेड्डी, उदय साहरान, अंश गोसाई, अम्रितराज उपाध्याय आणि पीएम सिंग राठोर.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या