Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedYahoo वेबसाईट भारतात बंद; जाणून घ्या तुमच्या अकाऊंट्सचे काय होणार?

Yahoo वेबसाईट भारतात बंद; जाणून घ्या तुमच्या अकाऊंट्सचे काय होणार?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर याहूने (Yahoo) आज भारतातील त्यांच्या काही सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे याहूद्वारे होणारे मजकूराचे प्रकाशन (Content Publishing) आता बंद होणार आहे…

- Advertisement -

परंतु टेक कंपनी व्हेरिझॉन मीडियाच्या (verizon media) मालकीच्या वेब पोर्टलने आपल्या युझर्सला आश्वासन दिले आहे की, त्यांचे याहू खाते, ई-मेलवर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही….

भारतात डिजिटल माहिती प्रकाशित करणाऱ्या मीडिया कंपन्यांच्या विदेशी मालकीवर मर्यादा घालणाऱ्या नवीन परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) नियमांमुळे याहूने भारतातील बातम्यांच्या वेबसाइट (News website) बंद केल्या आहेत.

यात याहू न्यूज (Yahoo news), याहू क्रिकेट (Yahoo Cricket), फायनान्स (Finance), एंटरटेनमेंट (Entertainment) आणि मेकर्स इंडिया (MAKERS India) यांचा समावेश आहे.

याहू वेबसाइटने एका नोटिसमध्ये म्हटले आहे की, 26 ऑगस्ट 2021 पासून याहू इंडिया कोणतीही माहिती प्रकाशित करणार नाही. परंतु तुमचे याहू खाते, मेलवर कुठलाही परिणाम होणार नाही. ही सुविधा नेहमीप्रमाणे काम करेल.

परदेशी निधीला 26 टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल न्यूज मीडिया आउटलेटवर मर्यादित ठेवलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे हा निर्णय व्हेरिझॉन मीडियाने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या