Friday, April 26, 2024
Homeनाशिकबारावीचा निकाल जाहीर; इथे करा पडताळणी अर्ज

बारावीचा निकाल जाहीर; इथे करा पडताळणी अर्ज

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी बारावीचा निकाल जाहिर केला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.

- Advertisement -

यंदाच्या बारावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल ९३.८८ टक्के इतका आहे. तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.तर शाखेनुसार विज्ञान शाखेने पहिला नंबर मिळवला असून एकूण निकाल – विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के तर अनुक्रमे वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के, कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के, MCVC : ९५.०७ टक्के तर विभागानुसार पाहिलं तर कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून कोकणचा निकाल ९५.८९ तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के आहे.

निकालाची राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झाल्यामुळे यंदा निकाल दीड महिना उशिरा लागला आहे.राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांकडून तीन हजार ३६ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यंदा लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास साधारण दीड महिन्याचा उशीर झाला .

पूनर्मुल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटहुन अर्ज करायचा असून, त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार आहे. छायाप्रत मिळाल्याच्या पाच दिवसांच्या आत पूनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावा लागणार आहे. याशिवाय परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण वाढीसाठी श्रेणी/ गुणसुधार योजना लगतच्या दोन संधींसाठी उपलब्ध राहील, असे परीक्षा मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलै या कालावधीत, तर छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल; तसेच शुल्कही ऑनलाइन भरता येईल.

इथे पहा निकाल ?

mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी – १४,१३,६८७

उत्तीर्ण विद्यार्थी – १२,८१,७१२

उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – ९३.८८

उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – ८८.०४

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९३.५७ टक्के उत्तीर्ण

पुनर्परीक्षार्थी निकाल – ३९.०३ टक्के उत्तीर्ण

१५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के

- Advertisment -

ताज्या बातम्या