Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशChinese President : शी जिनपिंग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष, ४० वर्षांची परंपरा...

Chinese President : शी जिनपिंग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष, ४० वर्षांची परंपरा काढली मोडीत

दिल्ली | Delhi

नॅशनल पीपल्स पार्टी च्या १४ व्या बैठकीत शी जिनपिंग हे तिसऱ्यांदाचे चीनचे राष्ट्रपती होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शी जिनपिंग यांची ताकद वाढली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी म्हणजेच आजपासूनच ते तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळतील. माओ झेडोंग नंतर देशातील सर्वात शक्तिशाली नेता म्हणून त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे.

Womens Day 2023 : अंधकारातून ‘ती’ नेते प्रकाशाकडे…! ‘लाईनवुमन’चा हा VIDEO पाहून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसची (CCP) वार्षिक बैठक रविवारी (5 मार्च) रोजी सुरू झाली. या बैठकीमध्ये नव्या राष्ट्रपतीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होता. नॅशनल पीपल्स काँग्रेसची बैठक आठवडाभर सुरू होती. त्यानंतर १० मार्च रोजी जिनपिंग यांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं.

सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या ‘स्मिता पाटील’ यांच्या नावामागचं रहस्य तुम्हाला माहितीय का?

मात्र, या बैठकीत शी जिनपिंग यांना काही आव्हानांचाही सामना करावा लागला. त्यांच्या झिरो-कोविड धोरणाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, या सर्व आव्हानांवर त्यांनी मात केल्याने त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.

Nagaland : BJP बरोबर NCP सत्तेत येणार, कसं आहे विरोधक नसलेलं नवं सरकार?

शी जिनपिंग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा चार दशके जुना नियम मोडीत निघाला. १९८२ पासून राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ १० वर्षांचा होता. शी यांना तिसरी टर्म दिल्याने हा नियम मोडला गेला आहे. पुढील दोन दिवसांत, शी यांनी मंजूर केलेल्या अधिकार्‍यांची मंत्रिमंडळातील उच्च पदांवर निवड केली जाणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या