Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

पुणे | प्रतिनिधी Pune

ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक अनिल अवचट (anil awachat) यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत….(Writer anil awachat passes away)

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दिवंगत अनिल अवचट यांचे सामाजिक कार्य त्यांच्या साहित्यात उतरत होते. बालसाहित्यात अवचट यांनी मोठे योगदान दिले.

साहित्यक्षेत्रात १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण लिहिण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदार इत्यादींना मिळाला आहे.

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.

अनिल अवचट यांना मिळालेले सन्मान

  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते २०१३ साली राष्ट्रीय पुरस्कार

  • १३ जानेवारी २०१८ मध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार

  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार

  • “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार

  • डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर

  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव

  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार

  • १४ नोव्हेंबर २०१० रोजी साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार

  • २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार

  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान २०१५ प्रदान

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

- Advertisment -

ताज्या बातम्या