Wednesday, April 24, 2024
Homeधुळेपिंपळनेर येथे रंगली कुस्त्यांची दंगल

पिंपळनेर येथे रंगली कुस्त्यांची दंगल

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

गोकुळ अष्टमीनिमित्त (Gokul Ashtami)येथील मुरलीधर मंदिर संस्थानतर्फे (Muralidhar Temple Institute) कुस्त्यांची दंगल (Wrestlers’ Riot) झाली. खान्देशातून आलेल्या मल्लांच्या कुस्त्या मोठ्या रोमहर्षक, चुरशी आणि थरारक अशा ठरल्या. यावेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. आ. मंजुळा गावित यांनी मैदानात येऊन प्रेक्षकांसह महिला मल्लांचे कौतूक केले.

- Advertisement -

मुरलीधर मंदिर संस्थानतर्फे 115 व्या अखंड नाम सप्ताहानिमित्त आज कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. यात धुळे, नासिक, मालेगाव, न्याहळोद, मनमाड व आदिवासी पश्चिम पट्यातील मल्लांनी आपले कसब दाखवले. संसारोपयोगी साहित्यासह रोख रकमेच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.

यावेळी आ. मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे, अँड. ज्ञानेश्वर एखंडे, मुरलीधर मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र पाटील, श्याम पगारे, चेतन पगारे, पांडुरंग चौधरी, संजु साळवे, योगेश नेरकर, लहू सोनवणे, सुदाम पगारे, शिलनाथ एखंडे, नानू पगारे, डॉ.ज्ञानेश्वर पगारे, सतिष पाटील, राजेंद्र शिरसाट, निंबा एखंडे, ग.ल.एखंडे, ताराचंद घाणेकर, त्र्यंबक पगारे, रवींद्र सोनवणे, सुरेश अहिरे, चंद्रकांत पुराणिक, डॉ.ज्ञानेश्वर पगारे, आकाश पगारे, हभप विजय महाराज काळे, रिखपचंद जैन, वसंत चौधरी, गिरीश पगारेे, श्रीकांत पगारे, रामकृष्ण सोनवणे यांच्यासह गोपाल नगर व एखंडे गल्लीतील तरुणांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

या कुस्ती मैदानात पंच म्हणून संजय ढोले, जे.टी.नगरकर, वसंत चौधरी, सुदाम पगारे, रोहिदास पैलवान यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे धावते समालोचन नितीन नगरकर यांनी केले. पिंपळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. स्पर्धा शांततेत पार पडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या