Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याWrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटूंची मोठी घोषणा; गंगेत विसर्जित करणार मेडल

Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटूंची मोठी घोषणा; गंगेत विसर्जित करणार मेडल

नवी दिल्ली | New Delhi

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना अटक (Arrested) करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीवर कुस्तीपटू आंदोलक (protester) ठाम आहेत. अशातच आता या आंदोलक कुस्तीपटूंनी त्यांनी कमावलेले मेडल गंगेमध्ये विसर्जित करणार असल्याची घोषणा केली आहे…

- Advertisement -

Weather Update : राज्यातील ‘या’
भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

यासंदर्भात कुस्तीपटू (wrestler) बजरंग पुनिया (Bajrang Punia) विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्वीट करत आपली या विषयीची भूमिका मांडली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक पत्र शेअर केले असून या पत्रात म्हटले आहे की, २८ मे रोजी आमच्यासोबत झालेला प्रकार सर्वांनी पाहिला. त्यानंतर या देशात आमच्यासाठी काहीच राहिले नााही. आजही आम्हाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आम्ही देशासाठी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियशनशिप पदक कमावले. परंतु, दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रकारानंतर आता आम्हाला वाटते, आम्ही हे पदक का कमावले होते? असे पत्रात म्हटले आहे.

तसेच गंगा नदीत (River Ganges) पदक (Medal) विसर्जित केल्यानंतर आमच्या आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले होते. आम्ही त्यांच्या इतके महान नाही परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती, असेही पत्रात म्हटले आहे.

Nashik Accident News : इको कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बालिकेसह तिघांचा मृत्यू

दरम्यान, जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी (Police) कडक कारवाई केली. यावेळी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. तर आंदोलकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या