Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसाप्ते-कोणे परिसरातील डोंगरावर वणव्याचा कहर

साप्ते-कोणे परिसरातील डोंगरावर वणव्याचा कहर

नाशिक । Nashik

साप्ते-कोणे (ता.त्र्यंबकेश्वर) येथील वनडोंगराला भीषण वणवा लागला.या वनव्याचा कहर इतका भयाण होता की हजारो हेक्टरवरील वनसंपदा या वनव्यात जळून खाक झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान वनक्षेत्र असुरक्षित असल्यानेच काही व्यसनी, टवाळ मंडळींकडून हे वणवे लावण्याचे प्रकार घडत आहे. वनमंत्र्यांनी तातडीने वनव्यातील नुकसानीचे पंचनामे करून वनव्यातील जंगलासह वन्यजीव, पक्षी, जैवविविधतेच्या नुकसानीचा जिल्हावार अहवाल सादर करावा अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी २०२१ ते मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात वनव्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात असंख्य वनसंपदा जळून खाक झाली असून पर्यावरण संस्थानी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनव्याच्या घटना मानवनिर्मित असून वनवामुक्तीचे केवळ स्टिकर लावून होणार नाही.वणवा लावणारे गुन्हेगार शोधण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला पाहिजे, मात्र अजूनही वनविभागाला गांभीर्य नसल्याने वनक्षेत्रात जिथे सामाजिक वनीकरण झाले,तिथेच वणवा लागण्याचे प्रकार वाढले आहेत.

दरम्यान साप्तेच्या दक्षिणेकडील डोंगर वनव्यात भस्मसात झाल्यावर त्याच दिवशी (दि १३)रात्री माळेगाव (ता त्रंबकेश्वर)येथे ही वनडोंगर परिसरात वणवा लागून हजारो झाडांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान जंगलसंपदेचे वणव्यात होणाऱ्या नुकसानीची वास्तविक पाहणी करून अहवाल समाजासमोर आणावा त्याशिवाय वनसंपदा सुरक्षीत राहील कशी?याला जितके वणवा लावणारे तितकेच वनविभाग ही जबाबदार असल्याची भावना वनमित्र देवचंद महाले यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या