PHOTOS # जखम डोक्याला, मलमपट्टी पायाला..!

by

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था (Condition of roads) अत्यंत वाईट (Very bad) असून त्यात महापालिका प्रशासनाचा (Municipal administration) कारभार हा अजब (strange) झाला आहे. शहरातील कमी खराब (less bad) रस्त्यातील खड्डे तत्काळ (Pits were immediately filled) बुजविले जातात आणि जे अत्यंत खराब (Very bad) झालेले रस्ते (streets) त्यावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात आणि आपले हाडे खिळखिळे करून घेतात, अशा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे (fill potholes) मनपा प्रशासन दुर्लक्ष (ignore) करत असल्याने जखम डोक्याला आणि मलमपट्टी हात-पायाला करत असल्याचा प्रकार मनपा प्रशासनाचा आहे.

जळगावकर खराब रस्त्यांनी प्रचंड त्रासलेले असून कधी या रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील असे रस्त्यांवरून ये-जा करतांना स्वःताच्या मणात बोलत जात खड्यांमधून मार्ग शोधत जावे लागत आहे. त्यात महापालिका प्रशासनाकडून शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांना सुरवात केली, काही रस्ते पुर्ण झाले तर काही ठिकाणचे रस्ते अर्धवट अवस्थेत असून तेथील काम संथ गतीने सुरू आहे. त्यात काही परिसरातील खराब रस्त्यांवरील खड्यात मुरूम, बांधकामाचे वेस्टेज मट्रेल, माती टाकून हे बुजविले जात आहे, त्यामुळे या रस्त्यांवर खड्यांसोबत धुळीचा देखील त्रास नागरिकांना प्रचंड सहन करावा लागत आहे.

दोन दिवसातच पून्हा खड्डे

आस्वाद चौक ते गिरणा टाकी दरम्यानचा रस्ता दुरुस्तीसाठी मक्तेदाराला वर्क ऑडर देवून सुध्दा त्याने सहा महिने काम केले नाही. त्यात आठ दिवसापूर्वी काम सुरू केले. त्यात ही त्याने अर्धवट काम, रस्त्यावरील खड्यांमध्ये डांबरची मलमपट्टी केली आणि दोन दिवसात डांबर निघून पून्हा तेथे खड्डे पडल्याने अशा थातूरमातुर कामांबाब त मक्तेदार व मनपा प्रशासनाच्या कामांवर नागरिका तिव्र रोष व्यक्त करत आहे.

रस्ते दुरुस्तीचे प्राधान्य चुकले

मनपा प्रशासनाकडून तसेच स्थानीक लोकप्रतिनीधी यांच्याकडून त्याच्या प्रभागात रस्ते दुरुस्ती व तयार करण्याचे काही ठिकाणी काम सुरू आहे. त्यात ही मनपा प्रशासन व लोकप्रतिनी ज्या रस्त्यावर वर्दळ जास्त आहे आणि त्याची अवस्था बिकट आहे तो रस्ता न घेता दुसरेच रस्ते हे तयार केले जात आहे. यात गिरणा टाकी ते गोव्हरमेंट इंजिनीअरींग कॉलेज मागे जाणारा या रस्त्यावर वर्दळ कमी आणि तो रस्ता आता तयार केला जात आहे. त्यात ऑस्वाद चौक ते गिरणा टाकी, कलेक्टर बंगला ते गिरणा टाकी, रामानंद नगर, वाघ नगर, गिरणापंपीग रस्ता, हरिविठ्ठल नगर स्टॉप या रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे आहे.

फैजपूरला होणार भव्यदिव्य “समरसता महाकुंभ” फैजपूर येथे आज स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव 

निधीचा खेळ

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मिळालेल्या 42 कोटीच्या निधी मंजूर होवून सहा महिने झाले. मात्र निधी नसल्याने या कामांना सुरवात झालेली नाही. मनपाने 5 कोटी 10 लाख रुपयांचा मनपाचा हिस्सा सार्वजनीक बांधकाम विभागाकडे दिला आहे, मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने मक्तेदार रस्त्यांचे काम करत नाही आहे. त्यामुळे केव्हा निधीचा खेळ संपणार आणि या शहराचे भाग्य उजाळणार असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

शेगांव येथे १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधीची जाहीर सभा 

कमी खराब रस्त्यावर डागडूजी

नविन बस स्थानका समोरील कमी खराब रस्त्यावर मनपा प्रशासनाकडून तीन-चार दिवसापूर्वी डागडूजी करण्यात आली. या रस्त्यांवर डागडूजी केली नसती तरी चालली असती. शहरातील अनेक ठिकाणी अशी रस्ते आहे जेथे मोठी वर्दळ असून त्याची अवस्था अत्यंत दयनी झाली आहे. पण या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची काम मनपा प्रशासन करत नसल्याचे दिसत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *