Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : जखमी मोरास ग्रामस्थांकडून जीवदान

त्र्यंबकेश्वर : जखमी मोरास ग्रामस्थांकडून जीवदान

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील ग्रामस्थांनी जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. तसेच वनविभागाला संपर्क साधत त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

- Advertisement -

दरम्यान (दि.१२) रोजी गणेशगाव येथील सरपंच उदार यांच्या घराशेजारी जखमी अवस्थेत मोर आढळला. यावेळी सरपंचासह काही ग्रामस्थांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने झुडपात जाऊन लपला.

काही वेळानंतर सरपंच यांनी या मोरास पकडून त्याच्यावर प्रथमोपचार केले. ही माहीती त्यांनी वनविभागास कळवली.

यानंतर दुसऱ्या दिवशी वनविभागाने घटनास्थळी पोहचून मोरास ताब्यात घेतले व ग्रामस्थांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या