Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशलालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

दिल्ली l Delhi

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अधिक खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे.

- Advertisement -

लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये हलवणार आहे.

तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानं शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी लालूंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. तब्बल पाच तास सर्वजण लालूंसोबत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या