Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशजगभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 7 लाख नवे रुग्ण

जगभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 7 लाख नवे रुग्ण

नवी दिल्ली –

जगभरात गेल्या 24 तासांत 7 लाख 18 हजार 826 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 15 हजार 976 रुग्णांचा

- Advertisement -

मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 9 कोटी 27 लाख 22 हजार 555 हूंन अधिक लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे.

कोविड-19 इंडियाच्या वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत भारतात एकूण 17 हजार 15 नवीन लोकांना करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात 3556, कर्नाटकात 746, दिल्लीत 357, उत्तर प्रदेशात 446 आणि पश्चिम बंगालमध्ये 723 अशा नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील सर्वाधिक 70 लोकांचा मृत्यू, याशिवाय केरळमधील 26, दिल्लीत 11, पश्चिम बंगालमध्ये 18 आणि छत्तीसगडमध्ये 15 लोकांचे मृत्यू झाले आहेत. तर भारतात 2 लाख 10 हजार 459 लोक अजूनही करोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या