Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : जागतिक रंगभूमी दिन विशेष : नाटक उभ राहण्यासाठी रंगकर्मीनी उभ...

Video : जागतिक रंगभूमी दिन विशेष : नाटक उभ राहण्यासाठी रंगकर्मीनी उभ राहील पाहिजे !

नाशिक । Nashik

एकीकडे करोनाची दुसरी लाट राज्यात सुरु अनेक शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याने लॉक डाऊनचा विचार केला जात आहे.

- Advertisement -

यामध्ये गेल्या वर्षभरापासून नाटकाचा पडदा देखील उघडलेला नाही. यामुळे नाटकाचा पडदा केव्हा उघडणार असा सवाल रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगकर्मींनी उपस्थित केला आहे.

आज जागतिक रंगभूमी दिन. खरंतर नाटकवाल्यासाठी तो ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग करतो, तो त्याचा रंगभूमी दिन असतो. त्याच्यासाठी प्रयोग म्हणजे रंगभूमीचं सेलिब्रेशन असतं आणि या उत्सवाच्या महोत्सव करण्यासाठी तो सतत तयारी करत असतो. नाटक डोक्यात घेऊन वावरत असतो. खरा नाटकवाला हा २४ तास नाटकवाला असतो, असं म्हणतात ते त्यासाठीच असावं.

मार्च २० पासून आतापर्यत नाटकाचे प्रयोग बंद ठेवण्यात आले आहेत. जानेवारी पर्यंत कुठ स्थिर होतो न होतो तोच करोनाने पुन्हा डोके वर काढले. पुन्हा नाटक क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, इतर सहकलाकार यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. याचसोबत थिएटर मालकांचेही धाबे दणाणले आहेत. तसेच नाटक व्यवसायाच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंडळीना इतर रोजगार शोधावे लागले आहेत.

परिणामी गेल्या वर्षभरापासून आपण सर्व करोनाशी लढत आहोत. या कोरोनामुळे सामान्यांसह अनेकांना फटका बसत आहे. यात नाटक क्षेत्रातहि अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली. वर्षभरापासून लॉक डाऊनशी रंगभूमी झुंज देते आहे. त्यातून काहीअंशी नाटक क्षेत्र सावरले असले तरीही अजूनही पूर्णतः पडदा उघडलेला नाही. याच पार्श्वभूमीवर नाशकातील रंगकर्मींशी साधलेला संवाद.

गेल्या वर्ष भरापासून करोनाशी दोन हात करीत आहेत. या काळातही नाट्यकर्मींनी नाट्यवेड न सोडता नाटक जिवंत ठेवले. मग ते ऑनलाइन असो, वर्कशॉप असो किंवा चर्चासत्र असो. अनेक रंगकर्मीनी लॉकडाऊन मध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले. तसेच अनेक नव्या कलाकृतीं या काळात जन्मास आल्या. अनेकांनी गलरी, खुले मैदान या ठिकाणी रंगमंच उभारून नाटक चालू ठेवले.

-सचिन शिंदे , दिग्दर्शक सपान

लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टीना मुकाव लागल. परंतु नाट्यकर्मिनी धीर न सोडता स्वतःवर काम करण्यास भर दिला. एकीकडे नाटकातून प्रबोधन होत असताना लॉकडाऊनचा काळ धडकी भरवणारा होता. परंतु यातुन खचून जाता नाट्य कलाकार उभे राहिले. सध्या नाटकासाठी प्रेक्षक जमवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा एकदा प्रायोगिक रंगभूमी उभारी घेईल.

-आदिल शेख, लेखक, दिग्दर्शक

नाट्यकर्मींसाठी अत्यंत बिकट काळ म्हणावा लागेल. परंतु यावर मात करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठं युद्ध करण्यापेक्षा दररोज छोटे छोटे युद्ध जिंकावी लागतील. करोनाच्या काळात नाटक सर्वाधिक बाधित झाले. गेल्या वर्षभरापासून मराठी रंगभूमी ठप्प झाली आहे. तरीदेखील काही ठिकाणी छोटे छोटे प्रयोग सुरु होते. मागील इतिहास पहिला तर मराठी रंगभूमीने अनेक धक्के सहन केले आहेत. याआधी प्लेग, कॉलरा या रोगांनी देखील थैमान घातले होते. यातूनही रंगभूमी उभी राहिली होती. त्यामुळे याकाळातही आपण सर्वानी एकत्र येऊन उपाय शोधणं गरजेचे आहे.

-दत्ता पाटील, नाट्य लेखक

लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाची साधनेच बंद आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून ज्यांची उपजीविका चालते, अशा कलाकार, तंत्रज्ञ यांना काम नसल्यामुळे हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. कमी उपस्थितीत जरी प्रयोग होत असले तरी त्यातून होणारा खर्च भागवणेही शक्य होत नाही. आता शहरात तर पुन्हा कोरोनाचा जोर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चर्चाही कानावर येत आहे. सर्वांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे कारण पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही.

-रफीक सैय्यद, अभिनेता

नाशिकची रंगभूमी

नाशिक जिल्ह्याला नाटकाची समृद्ध परंपरा लाभलेली दिसून येते. साधारण १९५० पासून नाटक परंपरा पाह्यला मिळते. सुरवातीला सार्वजनिक वाचनालयाने परशुराम सायखडेकर यांनी दिलेल्या देणगीतनू प. सा. नाट्यगहृ उभारले. त्या माध्यमातून नाशिकची सांस्कृतिक भूक भागवली जाऊ लागली.

त्यानंतर नाशिककरांचे नाट्यवेड यामाध्यमातून जोर धरू लागले. पुढे १९८३ मध्ये महाकवी कालिदास कलामंदिर हे सुसज्ज व वातानुकुलित नाट्यगहृ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरु झाले. त्यानतंर व्यावसायिक नाटके नाशिकला होऊ लागली. त्यानंतर नाशिकला लाभलेली नाटक परंपरा उल्लेखनीय आहे. हि परंपरा आजतागायत टिकून आहे, हे विशेष

- Advertisment -

ताज्या बातम्या