Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशWorld Ozone Day 2020 : जाणून घ्या का साजरा करतात 'जागतिक ओझोन...

World Ozone Day 2020 : जाणून घ्या का साजरा करतात ‘जागतिक ओझोन दिन’

आज १६ सप्टेंबर, जागतिक ओझोन दिन. सूर्य, पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी जितका पोषक, तितकाच घातकदेखील आहे. सूर्यापासून येणारी मध्यम अति-नील किरणे माणूस व प्राण्यांमध्ये विविध आजार उत्पन्न करू शकतात. अशा मध्यम अति-नील किरणांना शोषून घेत, ओझोन आपली रक्षा करतो. मात्र मानवाच्या काही चुकांमुळे ओझोनच्या थराला छिद्रे पडण्यास सुरुवात झाली आहे. आपणा जाणून घेऊयात ‘जागतिक ओझोन दिन’ का साजरा करतात.

फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !

- Advertisement -

ओझोन छिद्रामुळे होणारे घातक परिणाम आंतरराष्ट्रीय संघटनांच्या लक्षात येऊन त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणार्थ योग्य ती पावले उचलली. त्याचाच परिणाम म्हणून १९८७ साली मॉंट्रियल करार झाला. क्लोरोफ्लुरोकार्बन, अर्थात सीएफसीच्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाय आधी विकसित देशांनी आणि कालांतराने विकसनशील देशांनी करून सीएफसींची निर्मिती आणि वापर पूर्णपणे थांबवावा अशी योजना ह्या कराराद्वारे आखली गेली. ह्या करारातील अटी १९८९ पासून लागू झाल्या.

त्यानुसार सीफसीचा वापर कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी विकसित आणि विकसनशील देशांत सुरू झाली. ह्या अटींची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास २०५० पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत व्हावा असा अंदाज आहे. ह्या अटी जगभरातील अनेक देशांनी मान्य करून त्यांच्या पालनास सुरुवात केली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकाराचे ते उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सचिव कोफी अन्नान ह्यांनी म्हटल्याप्रमाणे “हे आजवरच्या यशस्वी जागतिक सहकाराचे एकमेव उदाहरण असावे.” १९९१ साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२ साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.

पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपण हाच खात्रीचा उपाय आहे. आंबा, पिंपळ, वड, निंब अशा शतकानुशतके टिकणार्‍या या मोठ्या वृक्षांप्रमाणेच घरोघरी तुळस लावणे हा वातावरणातील प्राणवायू व ओझोनवायू वाढविण्याचा प्रभावी उपाय आहे. यासाठी युनोच्या ’ओझोनस्तर वाचवा’ समितीने जगभरातील शालेय विद्यार्थ्यांना याविषयी जागृती करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जगभरातील शाळांमधून जागतिक ओझोन दिवस विद्यार्थ्यांच्या हस्ते तुळशीची रोपं लावून साजरा केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या