Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजागतिक महासागर दिन : स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कशी घेणार काळजी

जागतिक महासागर दिन : स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कशी घेणार काळजी

8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात या दिवसाला विषय महत्व आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस 8 जूनपासून अधिकृतरीत्या साजरा करण्यास सुरूवात केली. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव 1992 मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून द ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे.

जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वर्षातून एकदा साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ठ्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते. दरवर्षी एखादा ध्येय ठेऊन हा दिवस साजरा केला जातो. 2018 मध्ये प्लास्टिकपासून महासागराचे रक्षण हे ध्येय ठेवण्यात आले होते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 71 टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल 97 टक्के जलसाठा हा खाड्या, समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे.

- Advertisement -

द ओशन प्रोजेक्ट या 1997 साली अमेरिकेत स्थापन झालेल्या (आणि आता जागतिक झालेल्या) प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, संग्रहालये यांच्या संघटनेने एकच महासागर ही संकल्पना मांडली. परंतु भौगोलिकदृष्ठ्या आणि राजकीयदृाही या एकच महासागराची पाच खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे समुद्र हा खाद्य आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन पुरविणारा स्रोत, जैवविविधतेचे महाकाय भांडार, अनेकविध रत्ने, खनिजे, तेल आपल्या उदरात बाळगणारा रत्नाकर. ही सर्व वर्णने अपुरी पडतील, अशा अगणित मार्गानी महासागर मानवासाठी व एकूणातच चराचर सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

समुद्र किनारे स्वच्छ ठेवा – मनुष्याने आपल्या पर्यावरणात खूप कचरा पसरवला आहे. समुद्रकिनारी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पिकनिकला गेल्यास याठिकाणी अन्न पदार्थ , पेय, त्यांची पाकिटे, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि तिथे अशा अनेक गोष्टी आपल्या समुद्र आणि त्याकरिता चांगल्या आहेत. सजीवांसाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत आपण वेळोवेळी मोहीम राबवून हे समुद्रकिनारे स्वच्छ केले पाहिजेत. समुद्रकिनारी असणार्‍या मानवी वस्तीने जर खालील काही सवयी अंगीकारल्या तर नककीच काही प्रमाणात .

प्लास्टिकचा वापर थांबवा, कापडी पिशव्या वापरा – प्लास्टिकच्या पॉलिथीन, प्लास्टिकच्या बाटल्या, इतर प्लास्टिक वस्तू आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अशी प्लास्टिक जी सडत नाही आणि पुन्हा वापरली जात नाही, ती आपल्या वातावरणात वर्षानुवर्षे अशीच राहतात. प्लास्टिक पिशव्या समुद्रात टाकल्याने दरवर्षी दहा लाखाहून जास्त जलीय प्राण्यांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत आपण कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केल्या पाहिजे.

कॉस्मेटिक उत्पादने टाळा – आजच्या युगात, सौंदर्य उत्पादनांचा भरपूर वापर होत आहे. अशा परिस्थितीत ही उत्पादने तयार करणार्‍या कंपन्यांकडून बर्‍याच कचरा तयार होतो, जो समुद्रापर्यंत टाकला जातो. हा कचरा समुद्रातून बाहेर काढणे अशक्य आहे. सौंदर्य उत्पादने आणि पॅकेजेसमध्ये वापरल्या जाणार्‍या मायक्रोबीड्स आणि मायक्रोप्लास्टिक्स महासागरापासून फिल्टर करणे अशक्य आहे. सौंदर्यप्रसाधनांमधील ही विषारी रसायने नाल्यामधून महासागरामध्ये जातात, यामुळे पर्यावरणाला नुकसान होते. यामुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो.

जागतिक महासागर दिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, स्वयंसेवी संस्था, संशोधक –

अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण कयास आहे. सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. कचरा कोणताही असो-फेका समुद्रात! अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कचर्‍याने काय होतंय? ही प्रथा सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. या पाण्याच्या खराब दर्जामुळे समुद्रातील मासे व अन्य जिवांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक प्रकारची औषधी शैवाल वनस्पतीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हवामानावर परिणाम होत आहे. ही सर्व हानी टाळणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्ट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या