Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : जागतिक तंबाखू विरोधी दिन : कर्करोगाचा योग्यवेळी उपचार झाल्यास रुग्ण...

Video : जागतिक तंबाखू विरोधी दिन : कर्करोगाचा योग्यवेळी उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस ( World No-Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो, यानिमित्ताने अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals) समूहाच्या अपोलो कॅन्सर सेंटर मुंबई आणि नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे आरोग्यपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते…

- Advertisement -

यावेळी अपोलो कर्करोग विभागाचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेष्ठ कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अनिल डिक्रूज (Dr. Anil D’Cruz), पोटाचे, लिव्हरचे कर्करोग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. राजेश शिंदे (Dr. Rajesh Shinde), किडनी कर्करोग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अश्विन ताम्हणकर (Dr. Ashwin Tamhankar) यांचे व्याख्यान पार पडले.

यावेळी बोलताना डॉ. अनिल डिक्रूज म्हणाले, तंबाखूचे कोण्यातही प्रकारचे सेवन अत्यंत हानिकारक आहे. कर्करोगाचे (Cancer) लवकर निदान आणि योग्यवेळी उपचार झाल्यास रुग्ण दगावण्याचा धोका कमी असतो.

अपोलो हॉस्पिटल समूह हा नेहमीच अत्याधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी आग्रही आहे. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईचे कर्करोग तज्ञ आता अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये महिन्यातून दोनदा रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचार करण्यासाठी उपलब्ध असतील. याचा फायदा नाशिकसोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला होणार आहे.

डॉ. अनिल डिक्रूज यांच्याविषयी

हेड आणि नेक कॅन्सरमध्ये स्पेशलायझेशन असलेले देशातील सुप्रसिद्ध कर्करोग शस्रक्रिया तज्ञ तसेच अपोलो कॅन्सर विभागाचे संचालक आणि भारतातील वरीष्ठ कॅन्सर सर्जन आहेत. डॉ. डिक्रूज हे आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (जिनिव्हा) चे अध्यक्ष असून कर्करोगाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचा त्यांना ३३ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी बरेच कॅन्सर तज्ञ आणि सर्जन घडवले आहेत. भारताच्या प्रत्येक शहरात त्यांचे विद्यार्थी आहेत. डॉ. डीक्रूझ हे जिनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या युनियन इंटरनॅशनल फॉर कॅन्सर कंट्रोलचे अध्यक्ष-निर्वाचित (2018-2020) आणि अध्यक्ष (2020-2022) आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या