Wednesday, April 24, 2024
HomeजळगावWorld Heritage Day ; भारतातील 108 शिवमंदिरांपैकी एक कपिलेश्वर महादेव मंदिर

World Heritage Day ; भारतातील 108 शिवमंदिरांपैकी एक कपिलेश्वर महादेव मंदिर

जळगाव – jalgaon

आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टी जतन करण्याची जाणीव असावी यासाठी हा दिवस जागतिक वारसा दिन (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -

भारताला निसर्ग आणि संस्कृतीचा उच्च वारसा लाभला आहे. आपली वने, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसृष्टी यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ही आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. आणि अशी माहिती असणं, आपल्या पुढच्या पिढीला करून देणं आणि त्यायोगे त्यांचं संवर्धन करणं हे आपलं एक मूलभूत कर्त्यव्यही आहे. अर्थात आजचा दिवस हा ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

आपल्या महाराष्ट्रातही अशी अनेक जगप्रसिध्द पुरातन लेण्या, किल्ले, मंदिरे आहेत. त्यातच खान्देश म्हटला तर याठिकाणी सुध्दा पुरातकालीन मंदिरे, किल्ले, वास्तु आहेत. यातील पुरातकालीन मंदिरांबद्दलची माहिती जाणून घेऊया….

कपिलेश्वर महादेव मंदिर

(amalner) अमळनेर तालुक्‍यातील नीम (Neem) शिवारातील पांझरा, (tapi) तापी या नदीच्या पवित्र संगमावर प्राचीन तीर्थ असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर. अतिप्राचीन जागृत देवस्थान आहे. भव्य आणि पुरातन हेमांडपंथी शिव मंदिर म्हणून याचा विशेष लौकिक आहे. कपिल मुनींना सांख्यशास्त्राचे जनक, प्रवर्तक मानले जाते.

(dhule-jalgaon) धुळे व जळगाव जिल्हाच्या सिमेरेषेवर पांझरा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिर. या मंदिराला एक हजार वर्षापूवीचा इतिहास लाभलेला असल्याने या ठिकाणी कपिलमुनींनी तपश्चर्या करुण महादेवाची पिण्डीची स्थापना केली होती. यामुळे या मंदिराला कपिलेश्वर महादेव मंदिर हे नाव पडले आहे. या मंदिराचे बाधकाम पुरातन असून त्यानंतर थोरसमाज सेविका अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेखात आढळून येते.

कपिल मुनींचे वास्तव्य

कपिलमुनी हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक होते. उपनिषदात उल्लेख केलेल्या सिद्धांताचे यांनीच प्रथम शास्त्रीय विवेचन केले आणि सांख्य दर्शनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली म्हणून कपिलमुनींना आदिविद्वान असे म्हणतात. आपल्या वास्तव्यादरम्यान याच ठिकाणी त्यांनी शिवाची उपासना करत अंशरूपाने विराजित व्हावे अशी विनंती केली. स्कंद पुराणात उल्लेख असलेल्या भारतातील 108 शिवमंदिरांपैकी हे एक असल्याचा उल्लेख आढळतो.

विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म, आदींची कपिलमुनींनी सुरवात करून काही काळ तपश्‍चर्या आणि नामसाधना या ठिकाणी केली त्यावेळी कपिला गाय देखील येत असे त्यावरून श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील त्रिपिंडी महादेवाच्या मुर्त्यांची स्थापना केल्याचा इतिहास येथील शिलालेखात आढळतो.

मंदिराची रचना

संस्कृत आणि मोडी लिपीत दीपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहिलेले शिलालेख आजही दिसून येतात. मंदिर पूर्ण काळ्या पाषाण दगडात असून 18 दगडी खांबांवर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर आहे. सकाळी सूर्यकिरणांकडून महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले जाते हा विलक्षण अनुभव काहीकाळ भाविकांना अनुभवता येतो. महाशिवरात्री निमित्ताने याठिकाणी मोठी यात्रा भरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या