World Health Day 2022 : गुढी उभारा आरोग्याची

jalgaon-digital
2 Min Read

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपले आरोग्य दुर्लक्षित होत आहे. या जीवनशैलीमुळे आपले संपूर्ण जीवनच उद्धस्त झालेले आहे. तंदुरूस्त आरोग्य हे तर दुर्मिळ होत आहे. वयाच्या पन्नाशीनंतर जे आजार मानवाला होतात तेच आजार तरूणांना होऊन अकालीच मरण पावतात. किती धक्कदायक परिस्थिती ओढावली आहे मानवाने स्वतःच्याच हाताने व निष्काळजीपणाने.

चुकीच्या खानपानाच्या पद्धती, ऐषोआरामाचे जीवन अपुरी झोप, या सर्व चुकीच्या सवयींमुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यासर्व गोष्टींचा विचार करून 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. संपूर्ण जगात लोकांच्या वैद्यकीय समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे, तसेच आपल्या आरोग्याबद्दल कौतुक करणे आणि विशेषत: या साथीच्या रोगामध्ये स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून देण्यासाठी आजचा दिवस आहे .

दरवर्षी, जागतिक आरोग्य दिन (World Health Day 2022) 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य संस्थांपैकी एक आहे, जी आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी ठराव आणण्यासाठी आहे. जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल आणि भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आरोग्य कार्यक्रमाबद्दल जागरुक करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात एकसमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकांना आरोग्याच्या अफवांपासून दूर ठेवणे हा आहे.

जागतिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे आणि त्यावर कार्य करणे. गेल्या 72 वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटना जागतिक स्तरावर खूप चांगले काम करत आहे. ही संस्था जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी आरोग्य संस्था, व्यावसायिक गट आणि इतर संस्थांना आरोग्याशी संबंधित सुविधा पुरवण्यासाठी आहे. प्रत्येक वर्षी या तारखेसाठी एक थीम निवडली जाते जी थकज साठी प्राधान्यक्षेत्र दृष्टीक्षेपीत करते.

जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम ‘Our Planet, Our Health’ अर्थातच ‘आमचा ग्रह, आमचे आरोग्य’ अशी आहे. जागतिक आरोग्य दिन जीवनमान सुधारण्याच्या सवयींच्या सवयीला चालना देऊन आणि लोकांच्या आरोग्यासाठी चांगले आरोग्य जोडून आयुर्मानाच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करतो.

जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व म्हणून सगळे हा दिवस पाळतात ज्यामुळे समस्या मांडल्या जातात आणि समस्यांचे निराकरण होईल असे ठराव मांडले जातात आणि असे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून लोकांमध्ये स्वारस्य निर्माण होते आणि त्यांना या दिवसाबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुकता निर्माण होते. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आरोग्याचा लेखक असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *