Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : आनंद स्वत:मध्येच, फक्त तो शोधता आला पाहिजे

Video : आनंद स्वत:मध्येच, फक्त तो शोधता आला पाहिजे

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळविण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ आजच्या दिवशी (दि. २० मार्च) जागतिक आनंद दिन साजरा करत असते.

- Advertisement -

या दिना निमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंतीदेवीजी, उपक्षेत्रीय संचालिका, नाशिक यांच्याशी संवाद साधला, ‘शांततेसाठी लोकांमध्ये सुख व समाधानाची वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे.

आनंद स्वत:मध्येच असतो, फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे’. तसेच आजच्या करोना महामारीच्या काळात स्व:ताला स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे. जेणे करून येणाऱ्या काळात आव्हान पेलतांना सोपे होईल.

आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य़ गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा

० प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते. त्याचा आदर करा.

० जीवनात येणाऱ्या लहानसहान गोष्टींतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.

० सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

० खेळ, करमणूक, गायन, पर्यटन, नर्तन, वाचन या गोष्टींसाठी थोडा वेळ द्या.

० आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका.

० आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात.

० आयुष्यात दु:ख, त्रास होतच असतो, त्यांचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पाहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.

- Advertisment -

ताज्या बातम्या