Friday, April 26, 2024
Homeनाशिकआपलं पर्यावरण संस्थेतर्फे शनिवारी कंदमुळांची लागवड

आपलं पर्यावरण संस्थेतर्फे शनिवारी कंदमुळांची लागवड

आपलं पर्यावरण संस्थेतर्फे शनिवारी ५ जून रोजी कंदमुळांची लागवड करण्यात येणार आहे. नाशिकमधील देवराईमध्ये वेगवेगळ्या ५ ठिकाणी त्यासाठी अर्धा ते एक एकरच्या क्षेत्रात दाट पध्दतीने रोपे-झुडुपांची सांगड घालत लागवड करून ‘घन वन’ संकल्पना राबविणार आहोत. २१०० रोपांची तीन वर्षांसाठी जबाबदारी सम्राट ग्रुपने घेतली आहे, अशी माहिती आपलं पर्यावरण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी दिली.

राजकीय गोंधळ : सीएमओचे स्पष्टीकरण, निर्बंध हटवले नाही

- Advertisement -

५ जुन २०१५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर नाशिक देवराई येथे आपलं पर्यावरण ग्रुप व नाशिक वन विभाग (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून एकाच दिवशी तब्बल ११,००० देशी रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी ५ जून अर्थातच ‘जागतिक पर्यावरण दिन’ नाशिककरांच्या सदैव स्मरणात राहीला.

५ जुन २०१६ साली आपण म्हसरूळ जवळील वन विभाग डेपो येथे ६,००० रोपट्यांची लागवड केली. त्यांचे योग्य संवर्धन केले जात आहे.

५ जुन २०१७ साली आपण लोकांचे वृक्षसंवर्धनाविषयी प्रबोधन व्हावे या उद्देशाने देवराईमधील अकरा हजार वृक्षांचा दुसरा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.

५ जुन २०१८ साली आपण नाशिककर पर्यावरणप्रेमींना जंगलातल्या वेलींचं महत्त्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारच्या देशी एक हजार वेलींची नाशिक देवराई येथे लागवड केली.

५ जुन २०१९ साली आपण झुडपांचं जंगलातील महत्त्व कळावे, म्हणून ५०० जंगली झुडपांची लागवड नासिक वनराई येथे केली व वनराई येथील ६,००० वृक्षांचा वाढदिवस साजरा केला. या प्रकारे, जंगलातील वेगवेगळ्या वृक्ष,वेली व झुडपांची लोकांना माहिती व्हावी, यासाठी आपण रोपट्यांचे लागवड व संवर्धनाची जबाबदारी सातत्याने नाशिककरांच्या अमूल्य साथीने आपलं पर्यावरण संस्था पार पाडत आहे.

५ जुन २०२० साली आपण विविध कंदमुळांची लागवड करणार होतो. पण कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे आपण हे करू शकलो नाही. तथापि, आपलं पर्यावरण संस्थेच्या काही सक्रीय सदस्य यांच्या सहकार्याने चारशे रोपट्यांची लागवड करत वृक्षलागवड-संवर्धनाची परंपरा राखली.

यावर्षी कोरोनाचे सावट आहेच . परंतु सर्व नियमांचे पालन करत आपण येत्या ५ जुन २०२१ रोजी आपण कंदमुळांच्या लागवडीचा संकल्प पूर्ण करणार आहोत. तसेच देवराईमध्ये वेगवेगळ्या ५ ठिकाणी अर्धा ते एक एकरच्या क्षेत्रात दाट पध्दतीने रोपे-झुडुपांची सांगड घालत लागवड करून ‘ घन वन’ संकल्पना राबविणार आहोत. एका घन वनात चारशे (४००) ते पाचशे (५००) विविध प्रकारचे वृक्ष व झुडपे लावून आपण करणार आहोत. एकूण दोन हजार शंभर (२१००) वृक्ष आणि झुडपांना लगणारा खर्च तसेच तीन वर्षांसाठीपुढे ही सर्व रोपे दत्तक घेऊन त्यांचा आर्थिक भार नाशिकचे प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक सम्राट ग्रुपचे संचालक सुजाॅय गुप्ता यांनी उचलला आहे.

देवराई व वनराई येथे आपण वेळोवेळी साधारण २०० प्रकारचे वृक्ष, ४२ प्रकारच्या वेली व ४०प्रकारच्या झुडपांची रोपटी लावलीत व आजमीतीला येथील रोपांची संख्या सुमारे ३२ हजारांपर्यंत पोहोचविली आहे. तीन वर्षे या झाडांच्या संवर्धनाची, सांभाळण्याची जबाबदारी आपलं पर्यावरण संस्थेने घेतली होती; पण रोपांच्यासोबत जुळाळलेले ऋणानुबंधामुळे आपण गेली सहा वर्षे झाली त्यांचे संगोपन करत आहोत. यासाठी नाशिकमधील विविध संस्था, ग्रुप, तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांतील पर्यावरणप्रेमी मित्रांच्या व्यक्तिगत आर्थिक मदतीमुळे व श्रमदानाच्या बळावर ते यशस्वीपणे केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या