Blog : जागतिक एड्स दिन विशेष : मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे

नाशिक | जयश्री जाधव

सुनंदा (नाव बदललेले) आपल्या कुटुंबात आनंदाने जीवन जगत आहे. कुटुंबाने समाजाने मानवाने एचआयव्ही-एड्स रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास एड्स ग्रस्त रुग्ण स्वतःच्या दुःख जाणिवेत सुद्धा आनंदाने जीवन जगतो. कुटुंबात समाजात आपले अस्तित्व सिद्ध करतो. जेव्हा सुनंदाला कळाले की, आपला पती एच.आय व्ही पॉझिटिव्ह आहे. तेव्हा मनाने निर्णय घेतला, समजा मीच पॉझिटिव्ह असते तर?…

मला सर्वांनी स्वीकारावे आणि माणूसपणाने वागवावे. याच सकारात्मक प्रेरणेने आयुष्यात नशिबाने दिलेली पतीची साथ सांभाळत आनंदी आणि प्रगतीची जीवन जगत आहे. त्याचा आजपर्यंतचा प्रवास प्रत्येक कुटुंबाला, मानवाला प्रेरणादायी आहे. आजच्या जीवघेण्या अर्थार्जनासाठी धावपळ करत असताना आणि अनेक साथीचे आजार थैमान घालत आहे. आजाराला वयाची, शिक्षणाची, जातीची, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कोणत्याही भेदाची ओळख नसते.

निफाड तालुक्यातील सुनंदा लग्न करून सासरी पोहोचली. संसार वेलीवर सुंदर फूल उमलले असताना नशीब वेगळ्या वळणावर घेऊन जात होते. लग्नानंतर पतीची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली अवघ्या चार वर्षात पतीची दृष्टी गेली. पतीबरोबर सुनंदाला काळोख दिसू लागला व तिच्या अनेक चाचण्या केल्या. औषध उपचार सुरू होते, पण आजाराचे निदान होत नव्हते. आता डॉक्टर म्हणाले सर्व तपासण्या व उपचार केले तरीही आजाराचे निदान होईना. आता फक्त एकच तपासणी राहिली आणि ती एचआयव्हीची.

घरातल्या सर्वांना धक्का बसला. पण तपासणी केली. निदान सत्य ठरले. असे एकत्र कुटुंबाकडून मिळणारी वागणूक पूर्णतः बदलले स्वतःच्या आईला कळत नाही की, आपल्या मुलांना काय झाले. पण घरातील सदस्यांनी खूप मोठा आजार झाला आहे. आता आपल्याला त्याची लागण होईल. आपल्या घरातील मुला-मुलींचे लग्न होतील का? असे अनेक प्रश्‍न उभे राहिले. तेव्हा यावर एकच उपाय आणि तो म्हणजे यांना घरात न ठेवणे. कारण एकत्र कुटुंबात वेगळी मिळणारी वागणूक या पती-पत्नीला प्रकर्षाने जाणवू लागली.

सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्यात आला आणि दहा बाय दहाच्या खोलीत सुनंदा आपल्या अंध पती आणि मुला बरोबर नव्याने संसार करू लागली. सुनंदाने एक गाय घेतली ती गाय अकरा लिटर दूध द्यायची. त्यामुळे आर्थिक हातभार सुरू झाला. पण यावर जीवन जगता येणार नाही. त्यासाठी अजून उत्पन्नाचं साधन हवं म्हणून कुटुंबाकडून शेती मागून घेतली. दोन एकर शेतीमध्ये सुनंदाने पहिलेच पिक गव्हाचे काढले. ४० पोती गहू निघाला.

पती-पत्नीला आनंद झाला. शेतीत उत्पादन घेणे सुरूच होते. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी अंध पतीला पाठीमागे गाडीवर बसवून बरोबर घेऊन जाणे. शेतीची दैनंदिन कामे करणे त्याचबरोबर पतीची सेवा ही करणे. दरवर्षी पतीची तपासणी करणे स्वतःची आणि मुलाची ही तपासणी करणे. गेल्या दहा वर्षापासून नियमित आहार, व्यायाम औषधोपचार काळजी घेऊन आज आनंदाने संसार करत आहे.

मुलाला शिक्षण देत आहे. सुनंदा म्हणते, स्वतःच्या कुटुंबापेक्षा मला समाजाने खूप सहकार्य केले. माणूसपणाने आधार दिला. मदतीला धावून आले एका बाजूला जेव्हा मन खचले होते तेव्हाच समाजातील देव समान माणसांनी आधार दिला. माणूसपणाची माणसे असतात ही जाणीव मला झाली. या देवरूप माणसाणी अडीअडचणीत मदत केली त्यांचे आभार कसे मानावे… खूप लोक मदतीला धावून येतात.

या सर्वांचे आभार मानण्यासाठी म्हणूनच पतीच्या परवानगीने समाजापर्यंत ही कहाणी पोहोचू द्यावी त्याबद्दल लिहावे हा त्यांचा निर्णय होता. सुंनदाचे नाव आज बदलले आहे, कारण गेल्या दहा वर्षापासून सुनंदाने माहेरी आपल्या आई-वडिलांना दुःख होईल म्हणून कळू दिलेले नाही. माझ्या मुलीच्या वाट्याला असे आले. कदाचित त्यांना दुःख होईल. त्यापेक्षा मी समाजात मिळवलेला सन्मान पाहून त्याला आनंद होईल. याच विचाराने शेतीत कष्ट करत शेत बाग फुलवली आहे.

आज सुनंदाने, पती आणि मुलांसाठी नवीन चार लाखाचे मोठं घर बांधलेले आहे. शेतीने या माउलीला मनापासून सांभाळले म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुनंदा अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत. बँकेकडून घेतलेले कर्ज नियमित भेटल्याने बँकेने देखील त्यांचा सत्कार केला. अंध पतीला आपल्या मागे गाडीवर बसून रात्रीचे शेत पिकाला पाणी देण्यासाठी जातात स्वतः ट्रॅक्टर विकत घेऊन स्वतःच चालवतात आणि द्राक्ष बाग फुलविली आहे.

मनापासून कष्ट केल्यास चांगला विचाराने जीवन जगण्यास आपल्याला यश मिळते हे सुनंदाताई ठासून सांगतात. समाजात आणि महिलावर्गात आदर्श निर्माण केला आहे. तिथे डॉक्टरांचे प्रयत्न थांबले तिथून जगण्याचे बळ एका स्त्रीने कसे मिळवून दिले हे उत्तम उदाहरण आहे. पतीला काय त्रास होतो नेमके कोणते औषध घ्यायचे त्यानुसार तात्काळ निर्णय घेतात आणि आता त्या स्वतः डॉक्टरची भूमिका पार पाडत आहे. जगात काय चालले आहे याचे ज्ञान पती टी.व्ही. ऐकून संध्याकाळी सुनंदाला सांगतात. हसून खेळून आमचा संसार सुरू आहे. त्यात समाधानी आहे.

आज जागतिक एड्स दिनानिमित्त सुनंदा सारख्या असंख्य व्यक्तींचा सन्मान व्हावा कारण कुटुंबातील सदस्य जेव्हा रुग्णांना हिम्मत देतो तेच महान कार्य आहे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन सर्वत्र जनजागृतीसाठी साजरा केला जातो. शासकीय स्तरावरून स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधन केले जाते. समुपदेशन रुग्णांचे केले जाते. जेव्हा रुग्णाला एचआयव्ही-एड्स म्हणजे मृत्यू हा पर्याय दिसतो तेव्हा मृत्युला दूर कसे ठेवता येते आणि सुखी जीवन कसे जगता येते. सुनंदा ताई या प्रातिनिधिक आहे.

(लेखिका या शिक्षिका असून केटीएचएम महाविद्यालयातील पत्रकारिता विभागात शिक्षण घेत आहेत)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *