Monday, April 29, 2024
Homeनाशिकतलाठ्यांचे कामबंद आंदोलन

तलाठ्यांचे कामबंद आंदोलन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तलाठी (talathi) संवर्गाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने (Talathi Association) काम बंद आंदोलन ( Movement) सुरू केले आहे. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (digital signature certificate) तहसीलदारांकडे जमा करीत मागण्यांचे निवेदन तहसीलदार (tahsildar) राहुल कोताडे यांना देण्यात आले.

- Advertisement -

भूमिअभिलेख समन्वयक (Land Records Coordinator) रामदास जगताप यांनी तलाठी संघाचे राज्य अध्यक्षांना केलेल्या अर्वाच्य भाषेच्या विरोधात यावेळी निदर्शने करण्यात आली. जोपर्यंत जगताप यांची बदली होत नाही, तोवर सर्व तलाठी बेमुदत संपावर असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश हांडे, सरचिटणीस अरुण फसाळे,उपाध्यक्ष शीतल जाधव, मंडळ अधिकारी माणिक गाडे, संजय गाडे, संजय गांगोडे, स्वरूप गोराणे, शीतल पाटील, कविता गांगुर्ड, राहुल देशमुख, संतोष सोनवणे, प्रदीप तांबे, जे.यू परदेशी, के. यू. गायकवाड यांच्यासह संघटनेचे सभासद यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या