Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज काम बंद आंदोलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज काम बंद आंदोलन

मुंबई । प्रतिनिधी

राज्‍य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्‍णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. सरकारने तातडीने मागण्या मान्य न केल्‍याने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज, गुरुवारी चोवीस तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या आंदोलनाची दखल न घेतल्यास २२एप्रिपासून नाईलाजास्‍तव बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. हे आंदोलन करताना आम्‍हाला कुठल्‍याही रूग्‍णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्‍याने होणारी हेळसांड पाहूनच हे पाऊल अतिशय नैराश्यातून आम्‍हाला उचलावे लागत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायमस्‍वरूपी करण्यात यावे. त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या संघटनेच्या मागण्या आहेत. तसेच पद मंजूर आणि कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा सरकारवर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही, असा संघटनेचा दावा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या