Friday, April 26, 2024
Homeजळगाववाळू गट आरक्षित न केल्याने कामांना ब्रेक

वाळू गट आरक्षित न केल्याने कामांना ब्रेक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयातील 21 वाळू गटांसाठी ई टेंडर निघाले आहे. मात्र वाळू गट आरक्षित न केल्याने कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 21 गटांचे वाळू लिलावाची प्रक्रिया जाहीर झाली आहे. यातील काही गटांच्या लिलाव न झाल्यास ते राखीव करता येतील. तसेच सहा गटांच्या वाळू लिलावाचा निर्णय अद्याप पर्यावरण समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात शासकीय कामांसाठी वाळू राखीव ठेवता येईल. शासकीय कामांसाठी माागणी व हमीपत्र असल्यास त्यांनाही वाळू उपलब्ध करुन दिली जाईल.

- Advertisement -

प्रवीण महाजन, अप्पर जिल्हाधिकारी

शासकिय योजना व इतर कामांसाठी गट राखीव न ठेवता सर्व गटांची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्याकडे पत्रव्यहार केला आहे.

दिपनगर येथील 660 मेगावॅट विघुत निर्मितीच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यांनी दहा हजार ब्रास वाळूची मागणी केली आहे.

तसेच भागपूर प्रकल्पासाठी आव्हाणे, टाकरखेडा, वैजनाथ हे वाळू गट राखीव ठेवण्याची पत्रव्यवहार झाले. गेल्या अनेक दिवसांपासून वाळू अभावी काम रखडले आहे.

बोदवड परीसर, दीपनगर, घरकुले हे शासकीय प्रकल्प सहा महिन्यापासून वाळुमुळे बंद आहे.जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

तसेच भागपूर प्रकल्पांसाठी वाळूची मागणी केली होती. प्रकल्पांचे काम वाळू अभावी थांबले आहे. तसेच ग्रामीण भागात घरकुलांचे कामे थांबली आहेत.

त्यामुळे विकास कामांना अडथळा आणला जात असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या