Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedबीड बायपासवर पहिल्या उड्डाणपुलाचे काम सुरू 

बीड बायपासवर पहिल्या उड्डाणपुलाचे काम सुरू 

औरंगाबाद – Aurangabad

बीड बायपासचे रुंदीकरण, मजबुतीकरण सध्या सुरु आहे. या रस्त्यावर भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेता तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ न देता पुलांचे काम करण्यासाठी तीन यंत्रणांच्या समन्वयानंतर अडचणी दूर झाल्या आहेत.

- Advertisement -

शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावरील जड वाहतुकीला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत, ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वाखाली बीड बायपास बांधला गेला. २५ वर्षे पुढे वाहतूक कितपत राहील याचा अंदाज बांधून रस्ता बनविला गेला होता, पण दक्षिण बाजूने औरंगाबाद मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे बीड बायपासवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. रस्ता ओलांडताना अपघातांची मालिका सुरु झाली. याची दखल घेत बीड बायपास मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या प्रस्तावास हायब्रीड अॅन्यूटी प्रकल्पांतर्गत मान्यता दिली गेली. वर्षभरात साइड पट्ट्यांचे मजबुतीकरण केले गेले. या प्रस्तावात संपूर्ण रस्ता काँक्रिटचा केला जाईल. तसेच एमआयटी कॉलेज, संग्रामनगर टी पॉइंट आणि देवळाई चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.

बीड बायपासवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. वाहतूक पोलिस, प्रशासनाने जड वाहतुकीसाठी विशिष्ट वेळा निश्चित केल्या आहेत. जेणेकरुन छोट्या वाहनांची अडचण होणार नाही. गेल्या काही दिवसांत उड्डाणपूल उभारण्यासाठी बोअरिंग, जमीन तपासणी केली गेली. सर्व चौकांमध्ये असलेले सिग्नल हटवून अन्यत्र शिफ्ट केले तर चौकात पूल उभारणी करताना वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे वाहतूक शाखेने जागतिक बँक प्रकल्प विभागास कळविले होते. त्यानुसार संग्रामनगर टी पॉइंटवरील सिग्नल हलविले आहेत. या चौकात सहा मीटरचे बॅरिकेडिंग केले जाईल. ज्यामुळे कामाची सुरवात होईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल त्यावर उर्वरित दोन उड्डाणपुलांची कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तीनही उड्डाणपुलांचे डिझाइन तयार झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या