Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगावच्या देवेशची सातासमुद्रापार भरारी

जळगावच्या देवेशची सातासमुद्रापार भरारी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोना काळात संपुर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने नोकदारांसह शिक्षण क्षेत्रानेही ऑनलाईनचा वापर करुन आपले काम नियमीत सुरु ठेवले.

- Advertisement -

करोनाच्या या दहा महिन्याच्या काळात जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याने पालकांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आतंरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत 12 सुवर्ण पदकांचा मानकरी ठरत त्याने आपल्या नावावर हा विक्रम केला.

अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने 800 पैकी 800 गुण मिळवित ग्रँड ऑनर अ‍ॅवार्ड मेडल प्राप्त करीत 12 व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथ मध्ये स्थान मिळविले आहे.

थायलंड इंटर नॅशनल मॅथेमॅटिक्सऑलींपियाड, साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड या तीनही परिक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवित सुवर्णपदके मिळविली. सिंगापूर अ‍ॅन्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलींपियाड, हाँग काँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारु कॉम्पीटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलींपियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला इंटरनॅशनल गोल्ड मेडल प्राप्त झाली आहे. या परिक्षांपैकी तीन परिक्षेत देवेशला ङ्गवर्ल्ड चॅम्पीयनफ होण्याचा सन्मान देखील लाभला.

इयत्ता दहावीत मिळविला ऑनरचा बहुमान

वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाडमध्ये तृतीय रँक (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. या बारा सुवर्ण पदकाशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.8 वी) मध्ये प्रथम रँक तर अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.10 वी) मध्ये ऑनरचा बहूमान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने ङ्गहायर डिस्टींग्शनफ तर पर्पल कामेंट मॅथ मीट 2020 चा तो विजेता ठरला आहे.

करोनामुळे पारितोषीक वितरण सोहळा रद्द

कोरोनामुळे या वर्षी यापैकी अनेक परिक्षांचा प्रत्यक्ष परितोषिक वितरण सोहळा रद्द करण्यात आला असून सर्व परिक्षांचा निकाल, गुणपत्रके, प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच आम्हाला प्राप्त झाले आहेत. सुवर्ण पदके टपालामार्फत पाठविली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले असल्याची माहिती देवेशचे वडिल आर्किटेक्ट पंकज भय्या यांनी दिली.

अमेरीकेच्या प्री कॉलेजच्या लेटरमध्ये परिचय

वअ‍ॅलन चॅम्प 2020 बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया म्हणून देखील देवेशची निवड झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सेट प्रीकॉलेज न्यूज लेटरमध्ये त्याचा छायाचित्रासह परिचय प्रकाशित करण्यात आला आहे.

देवेश हा एल.एच.पाटील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी असून साने गुरुजी कॉलनी परिसरातील व्यंकटेश कॉलनीमधील रहिवासी आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझाईनर पल्लवी भय्या यांचा तो सुपूत्र आहे. गेल्या वर्षी देवेशला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या उपस्थितीत दिल्लीत गौरविण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या