Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाWomens World Cup 2022 : स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरचं शतक; भारताचा नवा...

Womens World Cup 2022 : स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरचं शतक; भारताचा नवा रेकॉर्ड

दिल्ली | Delhi

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला (Team India Women) विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघांत सामना झाला.

- Advertisement -

सेडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात सलामीवीर स्म्रीती मंधना (Smriti Mandhana) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या दोघींनी शतकी खेळी करत भारताला तब्बल ३१७ धावांचा डोंगर उभा करून दिला. याबरोबरच या दोघींनी केलेली दीडशतकी भागीदारी विक्रमी ठरली.

या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि यस्तीका भाटिया सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या. मात्र, या सामन्यातील सहाव्या षटकात यस्तीका भाटीया (३१ धावा) बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार मिताली राजलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तिनं नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ५ धावांवर असताना आपली विकेट्स गमावली.

मिताली पाठोपाठ दिप्ती शर्माही स्वस्तात माघारी परतली. तिला या सामन्यात केवळ १५ धावा करता आल्या. दरम्यान, एकाबाजूनं संयमी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनाला हरमनप्रीत कौरची साथ मिळाली. या दोघांनी तडफदार शतक ठोकून भारताचा स्कोर ३०० पार पोहचला.

भारतानं ५० षटकात ८ विकेट्स गमावून ३१७ धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून अनिसा मोहम्मदनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, हेली मॅथ्यूज, शकेरा सेलमॅन, डॉटीन आणि आलिया अॅलीनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघींच्या आक्रमक शतकामुळे टीम इंडियानं वर्ल्ड कप स्पर्धेत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतीय टीमनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त रन केले. यापूर्वी भारतानं वेस्ट इंडिज विरूद्धच २०१३ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ६ आऊट २८४ रन केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या