अनुदानासाठी महिलांचे तहसीलदारांना साकडे

jalgaon-digital
1 Min Read

सटाणा । प्रतिनिधी Satana

संजय गांधी निराधार योजनेतील ( Sanjay Gandhi Niradhar Yojana ) पात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे देण्यात आलेले अनुदान (Grants ) बँकांच्या वतीने लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नसून, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी महिला बालविकास विभाग समितीचे सदस्य शाम बगडाणे यांच्या नेतृत्वाखाली बागलाणमधील निराधार, विधवा, अपंग, विधूर, घटस्फोटीत, मजूर यांनी केली असून, याबाबत तहसीलदार जितेंद्र इंगळे ( Tehsildar Jitendra Ingle )यांना निवेदन दिले आहे.

बेघर तसेच निराधार व्यक्तींना शासनातर्फे दरमहा आर्थिक मदत करण्यात येते. राज्य शासनाने मे 2021 अखेर पर्यंतचे अनुदान सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खातेवर वर्ग केले असूनही बँकामार्फत संबंधीत लाभार्थ्यांना बँकेकडून पैसे अदा करण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करोना महामारीच्या काळात संबंधित लाभार्थ्यांना वारंवार बँकेच्या दारात खेटे मारावे लागत असून बँकेत पैसा असतानादेखील बँक अधिकारी चालढकल का करतात याबाबत विचारणा करण्यात यावी.

उद्योग, व्यवसायातील मंदीमुळे रोजगार मिळत नाही. त्यातच शासनाकडून मिळणारे अनुदान देखील बँका देत नसल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ज्योती ठाकरे, वंदना सोनवणे, सखुबाई साळुंखे, मनीषा मलाणी, ज्योती खैरनार, कलाबाई गायकवाड, माणिक अहिरे, सुनील सूर्यवंशी, गोकूळ परदेशी, शिवाजी भामरे, दिलीप खैरनार आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *