Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामहिलांची सुरक्षा ‘दामिनी’च्या हाती

महिलांची सुरक्षा ‘दामिनी’च्या हाती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, महिला, मुली यांना रस्त्यावर, सार्वजनिक तसेच शैक्षणिक ठिकाणी 24 तास सुरक्षित वाटावे व त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून शहरात महिला पोलिसांचे पथक 24 तास कार्यरत असावे, यासाठी स्वतंत्र ‘दामिनी’ पथकाची निर्मिती करून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज त्याचा शुभारंभ करण्यात आला.‘दामिनी’ पथकात 44 महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून 19 मोटरसायकलवर 14 नियमीत गस्त करणार आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आ. देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दामिनी पथकाची स्थापना व सुरुवात करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तालयातील सर्व 14 पोलीस ठाणे हद्दीत महिला अत्याचार, गुन्हे यांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांची मानसिकता बदलणे व टवाळखोरांवर कारवाई करण्याकरीता पोलीस स्टेशननिहाय दामिनी पथकातील दामिनी मार्शल महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी 24 तास तैनात असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महिला व मुलींची सुरक्षितता हे उद्दिष्ट समोर ठेवून महिला मार्शल हे अत्याधुनिक साहित्य, साधनांसह शाळा, महाविद्यालय, महिला वस्तीगृहे, बस स्थानक, बाजारपेठा, सिनेमा हॉल, उदयाने इत्यादी ठिकाणी गस्त करणार असून अशा परिसरात वावरणारे टवाळखोर, गुन्हेगार यांच्यावर दामिनी मार्शलची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे उपद्रवी इसमांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी प्रशांत बच्छाव, (पोलीस उपायुक्त, गुन्हे), पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त सचिन बारी, डॉ. सिताराम कोल्हे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या