Thursday, April 25, 2024
Homeजळगावशुध्द पाण्यासाठी महिलांचा महापालिकेवर मोर्चा

शुध्द पाण्यासाठी महिलांचा महापालिकेवर मोर्चा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गाळयुक्त पाणी (Stinking and muddy water) येत आहे. पाण्यामध्ये गाळ येत आहे. याविरोधात जुना जळगाव परिसरातील महिलासह नागरिकांनी (Citizens, women) महापालिकेवर (Municipal Corporation) मोर्चा (Morcha) काढण्यात आला. मात्र,महासभा सुरु असल्याने महिला आंदोलनकर्त्यांना तीन तास सभागृह बाहेर बसावे लागले. दरम्यान, महासभा संपल्यानंतर आयुक्तांनी (Commissioner) आंदोलनकर्त्यांना सभागृहात बोलवून निवेदन स्विकारले.

- Advertisement -

महापालिकेची विशेष महासभा सुरू असतांनाच जुने जळगाव परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा (Morcha) काढला. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरामध्ये खराब पाणी पुरवठा होत आहे. यात कित्येकदा खूप गाळ असणारे पाणी (Sludge water) या नागरिकांच्या नळांमधून येत आहे. या विरोधात आक्रोश करण्यासाठी नागरिकांनी हा मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी मागणी केली की महानगरपालिकेने घरपट्टी वाढवली आहे.

मात्र, जळगाव शहराचा विकास होत नाहीये. वर्षानुवर्ष जळगाव शहराचा विकास होत नसून आता मूलभूत सुविधा (Infrastructure) देखील नागरिकांना मिळत नाहीयेत. याशिवाय नागरिकांचे म्हणणे होते की, साधी गटार सफाई देखील या महानगरपालिकेला करता येत नाहीये. यासाठी महानगरपालिकेने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, महासभा सुरू असल्याने त्या ठिकाणी महापौर व आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी जाऊ शकले नाहीत.

मात्र, स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक चेतन सनकत, गिरिष खडके, विश्वनाथ खडके यांनी सभागृह बाहेर जाऊन नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी महिलांनी मनपा मालमत्ता कर घेते मात्र, सुविधा का देत नाही असा सवाल उपस्थित केला.

त्यातच नागरीकांना स्वच्छ पाणी देणे गरजेचे असतांना मनपा दुर्गंधीयुक्त पाणी देत आहे. त्यामुळे मनपा नागरीकांच्या जीवावर उठले का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. यावेळी महिला वर्ग चांगलेच संतप्त दिसून आले. यावेळी नगरसेवकांनी निवेदन स्विकारण्याचे मान्य केले मात्र, नागरीकांनी आम्ही आयुक्त व महापौरांना निवेदन देऊ, असा आग्रह धरला. त्यामुळे सभा संपल्यानंतर आयुक्त विद्या गायकवाड (Commissioner Vidya Gaikwad) व महापौर जयश्री महाजन यांना निवेदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या