Video महिला हॉकीपटूंना मोदी म्हणाले, तुमच्या कामगिरीने कोट्यवधी मुलींना प्रेरणा मिळाली

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांनी काल कांस्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या हॉकी संघाला स्वत: फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं प्रचंड कौतुक केलं. त्यानंतर आज हॉकीत पदक मिळवण्यात अपयश ठरलेल्या महिला संघाचे (Indian Women’s Hockey Team)सांत्वन करत त्यांच्या खेळाचे कौतूक केले. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले.फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या (Women’s Hockey Team) खेळाडूंशी फोनवरुन बातचित केली.

video पंतप्रधान मोदींचा हॉकी टीमला फोन, म्हणाले…

नरेंद्र मोदी काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या (Women’s Hockey Team) खेळाडूंशी फोनवर बोलतांना सांगितले, “तुम्ही पदक येऊ शकलं नाही, पण तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची आहे. पाच वर्षांपासून तुम्ही घाम गाळून केलेल्या कामगिरीमुळे देशातील कोट्यवधी मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी हॉकी संघाचे सर्व सहाय्यक आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो”

या संवादात नवनीत कौरला झालेल्या दुखापतीविषयी त्यांनी चौकशी केली. नवनीतच्या डोळ्याला दुखापत झाली असून ४ टाके पडल्याचं क्रीडापटूंनी मोदींना सांगितलं. “तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या मेहनतीमुळे हॉकीला पुनरुज्जीवन मिळत आहे” अशा भावनाही मोदींनी व्यक्त केल्या

भारतीय महिला संघानं मनं जिंकली

आज झालेल्या कांस्यपदकाच्या रोमांचक सामन्यात ग्रेट ब्रिटनने भारताला 4-3 ने पराभूत केले. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने पुनरागमन केलं होतं. भारतीय महिला संघानं 3-2 अशी आघाडी घेतली होती. पण पदकावर नाव कोरण्यात त्यांना अपयश आलं.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरुन शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देणारे ट्विट केले होते. टोकियो 2020 मध्ये आमच्या महिला हॉकी संघाची महान कामगिरी आम्ही नेहमी लक्षात ठेवू. त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला, असं नरेंद्र मोदी म्हणाले. संघातील प्रत्येक सदस्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताला या अद्भुत संघाचा अभिमान आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *