Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारजि.प.च्या पोटनिवडणुकीसाठी महिला आरक्षण जाहीर

जि.प.च्या पोटनिवडणुकीसाठी महिला आरक्षण जाहीर

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महिला आरक्षण काढण्यात आले. यात पाच ठिकाणी महिला आरक्षण काढण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या 11 जिल्हा परिषद सदस्यांचे आणि 14 पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळे या जागांवर नव्याने पोटनिवडणुक घेण्यात येत आहे. यासाठी नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या 11 जागांवर आता सर्वसाधारण गटातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.

त्यानुसार आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यात नंदुरबार तालुक्यातील कोळदे, मांडळ, रनाळा, शहादा तालुक्यातील कहाटूळ व अक्कलकुवा येथील जि.प.गट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. तर खापर ता.अक्कलकुवा, म्हसावद ता.शहादा, लोणखेडा ता.शहादा, पाडळदे ता.शहादा, खोंडामळी ता.नंदुरबार, कोपर्ली ता.नंदुरबार हे गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी काढण्यात आले आहे.

दरम्यान, शहादा तालुक्यातील सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, मोहिदे तह हे पंचायत समिती गण सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर डोंगरगांव, जावदे तबो, पाडळदे बु व शेल्टी हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहणार आहेत.

नंदुरबार तालुक्यातील गुजरजांभोली व नांदर्खे हे पंचायत समिती गण सर्वसाधारण गटासाठी तर पातोंडा, गुजरभवाली व होळतर्फे हवेल हे गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील कोराई पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या