Saturday, April 27, 2024
Homeनाशिकगर्भवती महिलेच्या खून प्रकरणी पतीवर गुन्हा

गर्भवती महिलेच्या खून प्रकरणी पतीवर गुन्हा

इंदिरानगर | Indiranagr

पाथर्डी फाटा परिसरात गर्भवती महिलेच्या खून प्रकरणी सदर महिलेचा पती याला संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. भरत जाधव(२८ असे संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या सी मधील विंग मधील दहाव्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या भरत जाधव यांच्या घरात शनिवार (दि२४) दुपारी चारच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत त्यांच्या प्रतिकार करणाऱ्या भरत यांच्या पत्नी प्रमिला जाधव (२६) यांचा गळा आवळून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी उघडीस आला होता. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती.

पाथर्डी फाटा येथे असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या सी विंग मध्ये भरत त्यांच्या पत्नी प्रमिला यांच्यासोबत वास्तवास आहे. भरत सकाळी सातपूर येथील कंपनीत कामाला गेला होता.

दुपारच्या सुमारास त्यांनी जेवणाच्या सुट्टीत पत्नीला मोबाईलवर संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र काही प्रतिसाद लाभला नाही. पत्नी प्रणीला गरोदर असल्याने चिंता वाढली भरत अर्ध्या तासात घरी पोहोचले असता दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली त्यांना आढळली. कडी उघडली असता समोर एका ब्लॅंकेट मध्ये पत्नी प्रमिला मृतावस्थेत पडलेली दिसून आली.

चोरट्यांनी प्रमिला यांना ठार मारत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोबाईल व घरात ठेवलेले दहा ते पंधरा हजाराची रोकड असा ऐवज घेऊन दरवाजाला कडी लावून पोबारा केल्याचे बनाव पती भरत जाधव यांनी पोलिसांना भासवले होते.

मात्र याप्रकरणी प्रणाली चे वडील कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व डॉक्टरांनी मृत्यूच्या सांगितलेला कालावधी घटनेच्या कालावधीशी सुसंगत होत नाही तसेच चोरी करणारा चोरट्यांनी घरातील इतर सामानाला हात न लावल्याने सामान अस्ताव्यस्त झालेले नाही.

मयत प्रमीला जाधव यांचे वडील तानाजी सावळीराम कचरे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या अंगावर असलेल्या दागिन्या ची किंमत एवढी नसून तसेच घरात रोख रक्कम असणे अशक्य आहे. त्यामुळे काहीतरी कारणावरून माझ्या मुलीचा पती भरत जाधव यांनी खून केल्याचा संशय आहे.

फिर्याद आणि संशयास्पद घटनेमुळे संशयित आरोपी भरत जाधव याला अटक करण्यात आली असुन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या