Friday, April 26, 2024
Homeनगरप्रशिक्षणाव्दारे महिला घेत आहेत, करोनाशी लढण्याचे धडे

प्रशिक्षणाव्दारे महिला घेत आहेत, करोनाशी लढण्याचे धडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य ग्रामीण (Maharashtra State Rural) जीवनोन्नती अभियान, नगर आणि जिल्हा परिषद (ZP) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकानिहाय कोविड (Covid 19) जाणीव आाणि जागृती प्रशिक्षणाचे (Awareness training) आयोजन 28 जून ते 20 जुलै दरम्यान करण्यात आलेले आहे. यात जिल्ह्यातील एक लाख 30 हजार महिलांना झुम अ‍ॅपव्दारे करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाट गरोदर महिला (Third wave of pregnant women), स्तनदा माता, लहान मुले यांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाव्दारे (Through Training) महिला एका प्रकारे करोनाशी लढण्याचे धडेच घेत आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील बचत गटांना गटातील महिलांना करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता (possibility of a third wave of corona) लक्षात घेता लहान मुले, स्तनदा माता, गर्भवती महिला (pregnant women) व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी या अनुषंगाने तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यामार्फत जिल्ह्यातील बचतगटातील महिलांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अनुषंगाने स्वयंसहाय्यता गटातील महिलांना जाणीव-जागृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (CEO Rajendra Kshirsagar) यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 14 ही तालुक्यांमध्ये डिजिटल संवाद (Digital communication) माध्यमांच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधण्यात येत आहे. 14 दिवस चालणार्‍या या उपक्रमात आत्तापर्यंत 4 तालुक्यांची संवाद पूर्ण झाला असून सुमारे 28 हजार महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण (Online Training for Women) देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये करोना आजारांमध्ये घरातील लहान बालके, स्तनदा माता, गर्भवती महिला यांची काळजी कशी घ्यावी, या विषयावर जिल्हा रुग्णालय येथील बालरोग तज्ज्ञ चेतना गोपाळ बहुरूपी या मार्गदर्शन करत आहेत.

महिलांना पडणारे प्रश्‍न

आतापर्यंत झालेल्या चार तालुक्यांच्या प्रशिक्षणात महिलांनी लहान मुलांना करोना झाल्यास कशी काळजी घ्यावी, लहान बाळाला करोना झाल्यास मातेला त्याच्या अगल करावे का, गरोदर मातांना करोना झाल्यास काय उपाय करावेत आदी प्रश्‍न बालरोग तज्ज्ञ डॉ. चेतना बहुरुपी यांना विचारले. त्यावर डॉ. बहुरूपी यांनी महिलांच्या प्रश्‍नांचे निरसन केले.

शेताच्या बांधावरही प्रशिक्षण

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसून सीईंओ क्षीरसागर आणि डॉ. बहुरूपी या दुपारी दोन वाजता प्रशिक्षणाला सुरूवात करत असून साधारण दीड तास मार्गदर्शन केल्यावर अर्धातास प्रशिक्षणाला हजर असणार्‍या महिलांच्या प्रश्‍नोत्तरासाठी अर्धातासाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे कार्यकर्ते गावातील महिलांच्या शेतात जावून त्यांना मोबाईलच्या माध्यातून प्रशिक्षणात जोडून घेत आहे. यामुळे शेताच्या बांधवर बसून महिला प्रशिक्षण घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या