Saturday, April 27, 2024
Homeनाशिककरोना साथीत महिला व बालविकास विभाग सेवा देण्यात आघाडीवर

करोना साथीत महिला व बालविकास विभाग सेवा देण्यात आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हयातील आदिवासी-ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच महिला व बालविकास विभागातील सर्व अधिकारी-सेवक यांच्या सेवाभावी कार्यामुळे ग्रामीण भागात घरपोहोच सेवा देण्यात आलेली आहे.त्यामुळे जीवनावश्यक सेवा देण्यात विभाग आघाडीवर असल्याचे नाशिक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती आर्कि.अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी सांगितले.

- Advertisement -

शुक्रवारी ( दि. १४ ) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.बैठकीस समिती सदस्य गणेश अहिरे , कविता धाकराव,रेखा पवार ,सुनिता सानप , गितांजली पवार-गोळे, कमल भाऊसाहेब आहेर , मिनाक्षी चौरे तसेच उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ( बालकल्याण) दिपक चाटे व २६ प्रकल्पाचे सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

करोना कालावधीत माहे मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० या करोना (कोवीड -१९ ) साथीच्या कालावधीत महिला व बालविकास विभागामार्फत नाशिक जिल्हयातील ग्रामीण -आदिवासी भागातील बालके, स्तनदा माता गर्भवती स्त्रिया याना घरपोहोच पोषण आहाराचा आढावा घेण्यात आला.बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी अमृत आहार योजना अंतर्गत आदिवासी भागातील बालकांना अंडी -केळीचा लाभ देण्यात आला.

अमृतआहार योजना (टप्पा क्र.२) (फक्त आदिवासी भाग) बालकाचे कुपोषण कमी करण्यासाठी अमृत आहार योजनांतर्गत आदिवासी भागातील गरोदर माता,स्तनदा माता यांना एक वेळ पुर्ण जेवणाचा लाभ देण्यात आलेला आहे. जिल्हयातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, स्तनदा माता, गर्भवती स्त्रिया यांना घरपोहोच आहार (टीएअार) व ३ वर्ष ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार (तांदुळ,गहु,मसुर,चणा,मिरची पावडर,हळद पावडर,मीठ सोयाबीन तेल) पॅकिंगमध्ये वाटप करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या