Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवाडीवऱ्हे पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा; आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा; आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!

वाडीवऱ्हे | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील फॅब कंपनीच्या कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यादरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले होते. तसेच कामगारांवर गुन्हेदेखील दाखल केले होते.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी सीटू संघटनेच्या माध्यमातून जनवादी महिला संघटनेच्या वतीने वाडीवर्हे पोलिस स्टेशनवर महिला व परिसरातील कंपनी कामगरांनी मोर्चा काढला. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी फैब कंपनीच्या कामगारांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून कामगारांना कायम करावे यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरु होते.

मात्र अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अरुंधति राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीव-हे पोलिसांनी कामगार करत असलेल्या शांततेच्या आंदोलनाला दडपून टाकले.

आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा तैनात करत कामगार आणि त्यांच्या परिवरातील महिलांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आंदोलकांच्या दुचाकी जप्त केल्या. तसेच सिटुचे जिल्हा सरचिटणीस देवीदास अडोळे यांना तड़ीपार करण्याची नोटिसदेखील काढण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कामगारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, कामगारांना मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाला अटक करावी, देवीदास अडोळे यांच्यावरील तडीपारची नोटीस मागे घ्यावी कामगारांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी सीटू संघटनेचे सीताराम ठोंबरे,जनवादी महिला संघटनेच्या सिंधु शार्दूल,कल्पना शिंदे,विजया टिक्कल, दत्ता राक्षे,मोहन जाधव,कांतिलाल गरुड़,भाऊसाहेब जाधव,मनोज भोर,विठोबा कातोरे,अशोक कदम आदिंसह गोन्दे वाडीव-हे औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील कामगार देखील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या