Tuesday, April 23, 2024
Homeजळगाववाईन विक्रीविरोधात महिला आक्रमक

वाईन विक्रीविरोधात महिला आक्रमक

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

आर्या फाउंडेशन, (Arya Foundation) सक्षम सेवा फाउंडेशन,मानवतर बहुद्देशीय संस्था, सक्षम नारी फाउंडेशन, साईलीला व श्रीकृपा बचतगट (Shrikrupa Bachatgat) यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र (Discussion session) घेण्यात आला. सुवर्णा गाडेकर यांनी कार्यक्रमाची सुरवात करून कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगीतले. भारतातच नव्हे तर संपुर्ण जगातील लोकांच्या मृत्यूची (death) संख्या करोना पेक्षा जास्त अँक्सिडेंट, व कॅन्सर, हार्ट डिसीज, स्ट्रोक यांच्या मुळाशी अल्कहोल आहे. आणि आता जर वाईनची विक्री (wine sales) सरसकट किराणा दुकानात होत असेल तर मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढणार आहे.

- Advertisement -

डॉ. मधू मानवतकर (Dr. Madhu Manavatkar) यांनी सुंदर मानवतेची प्रार्थना सादर केली.डॉ. वंदना वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले व व नवजिवन व्यसनमुक्ती (Detoxification) केंद्रात गेल्या 10 वर्षापासून काम करताना लक्षात आले आता या पाच वर्षांत व्यसनाधीनतेचे प्रमाण 15 ते 25 झाले आहे त्यामुळे हा वाईन विक्रीचा (wine sales) आदेश जर सरकारने मागे नाही घेतला तर भावी पिढी उध्वस्त होईल.

सक्षम कौन्सिलींगच्या आरती चौधरी (Aarti Chaudhary) यांनी सांगितले की व मॅरेज कौन्सिलींग, जोडप्यांचे भांडणाचे कारण दारु आहे आणि या आदेशामुळे कौटुंबिक समस्या नक्कीच वाढतील. नंतरचे चर्चा सत्र सुरू झाले 17 महिलांनी भाग घेतला.

प्रो. डॉ भाग्यश्री भंगाळे (Dr. Bhagyashree Bhangale) यांनी चर्चा सत्राची सुरवात केली. डॉ. सुषमा खानापूर, वर्षा लोखंडे, राजश्री बादशहा, भारती राठी, अ‍ॅड. चित्रा आचार्य, सुवर्णा इंगळे, भारती म्हस्के, डॉली टाक, सायमा एतेशाँ, भावना झा, पल्लवी मुळे, प्राची राणे, सुनीता जोशी कल्पना टेमाणी, अंजुम खान, यांनी चर्चा सत्रात हिरीरीने भाग घेतला.

शेवटी आरती चौधरी यांनी कार्यक्रमाचा सारांश सांगीतला व सर्व महिलांनी एकमताने याचा विरोध दर्शविला असे सांगितले.आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत व आमचा बुलंद आवाजासाठी आम्हाला कोणत्याही पक्षाची, राजकारणाची गरज नाही असे ठाम पणे सांगितले. आभार अ‍ॅड. जास्वंदी भंडारी यांनी मानले.

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे (Maharashtra State Drug Control Board) प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पाठींबा दिला व भुसावळच्या जागरूक महिलांचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्रातील महीला ठेवतील व सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करतील. किराणा दुकानात वाईन विक्रीचा आदेश शासनाने मागे घ्यावा यासाठी चर्चा भुसावळ मधील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महिलांचे चर्चा सत्र घेतले व 5000 सह्यांचे निवेदन शासनाला दिले यासाठी अ‍ॅड. जास्वंदी भंडारी यांनी पुढाकार घेतला व कार्यक्रम यशस्वी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या