Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनवापूर तालुक्यात नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

नवापूर तालुक्यात नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

नवापूर | श.प्र. – NAVAPUR

गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे (Record break due to rain) शेगवे गावालगत (Near Shegwe village) असलेल्या नदीपात्रात (river basin) महिलेचा मृतदेह (Woman’s body) आढळून आला. तसेच संततधार पावसामुळे (incessant rains) शहरात दोन ठिकाणी घराचे नुकसान (Damage to the house) झाले आहे.

- Advertisement -

नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, तालुक्यातील शेगवे गावालगत असलेल्या नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

तसेच शहरातील नवी भोई गल्ली येथे मंगल पांडुरंग मराठे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. सदर घराचा पंचनामा सर्कल नागेश चौधरी, कमलेश भोई यांनी केला. मेमन गल्ली या ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत पंचनांमा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य व घरातील साहित्य मातीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर बघता प्रशासनही अलर्ट झाले आहे.

दरम्यान, दि.११ जुलै रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांताधिकारी मीनल करनवाल दाखल झाले. तालुक्यातील सर्व धरण ओव्हर फ्लो झाल्याने रंगावली नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली. जिल्हाधिकार्‍यानी तहसीलदार मंदार कुळकर्णी, मुख्याधिकरी स्वप्नील मुदलवाडकर यांना तत्काळ नदीकिनारी राहणार्‍या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या