Saturday, April 27, 2024
Homeनगर‘त्या’ महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय

‘त्या’ महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेचा खून करून मृतदेह रेल्वे स्टेशन भागात मोकळ्या पडीक शेतामध्ये आणून टाकला होता. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला असून तो नाशिक येथे तपासणीसाठी पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

मंगळवारी सकाळी इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेस असणार्‍या मोकळ्या पडीक शेतात एका 35 ते 40 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेच्या मृतदेहा शेजारी एक सिमेंट ब्लॉक पडलेला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केली असता महिलेचा मृत्यू डोक्यात मार लागून झाल्याचा अहवाल देण्यात आला. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून तो नाशिक येथे पाठविला आहे. दरम्यान महिलेची ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तेथील दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे चौकशी केली. महिलेजवळ आढळून आलेल्या डायरीमध्ये ती छत्तीसगड येथील असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांचे एक पथक तेथे पाठविण्यात येणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या