Friday, April 26, 2024
Homeधुळेअपघातात महिला ठार, 4 जण जखमी

अपघातात महिला ठार, 4 जण जखमी

धुळे dhule । प्रतिनिधी

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat-Nagpur National Highway) साक्री तालुक्यातील तामसवाडीनजीक भरधाव अ‍ॅपेरिक्षा (Aperiksa) पुढे चालणार्‍या डंपरवर (dumper)धडकल्याने (hitting) उलटली. त्यात गंभीर जखमी होवून महिला ठार (Woman killed) झाली. तर चार जण जखमी (wounded) झाले आहेत. काल दि. 20 रोजी दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

अपघाताबाबत विकास दगडु पवार यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशाबाई दगडु पवार (वय 45 रा. तामसावाडी ता. साक्री), कुणाल धनराज बेडसे (वय 19), सचिन पितांबर सरग (वय 39 रा. महिर), मिनाबाई राजेंद्र सोनवणे (वय 52) व म्हाळसाबाई साहेबराव सोनवणे (वय 60 रा. तामसवाडी) हे काल दि. 20 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अ‍ॅपेरिक्षाने (क्र.एमएच 18 डब्ल्यु 754) तामसवाडी येथून साक्रीकडे जात होते.

त्यादरम्यान रिक्षा महादेव हॉटेलसमोर आली असता पुढे चालणारे डंपर (क्र. एमएच 02 एफसी जी 8949) डाव्या बाजुला वळाले. मात्र अ‍ॅपेरिक्षा चालकाने सुरक्षीत अंतर न ठेवता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने डंपरला जोरदार धडक दिली. त्यात आशाबाई यांच्यासह पाचही प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी आशाबाई पवार यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षा चालकावर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलींचे अपहरण

जिल्ह्यात विविध घटनेत तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

देवपूरात नकाणे रोडवरील साईबाबा नगरात राहणार्‍या 16 वर्षीय मुलीला एकाने काहीतरी फुस लावून पळवून नेले. दि. 19 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नरेंद्र बापु खरात (रा. दत्तमंदीर चौक, धुळे) या संशयीत आरोपीवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ माळी करीत आहेत. तसेच तामथरे येथून काल दि. 20 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी काहीतरी फुस लावून पळवून नेले.

शिंदखेडा पोलिसात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला असून तपास पोहेकाँ चव्हाण करीत आहेत. तसेच छडवेल पखरून गावातून देखील 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. ती कुटुंबीयांसह सोलापूर जिल्ह्यातील अफजलपूर येथे गेली असता तिचे बसू ड्रायव्हर नावाच्या व्यक्तीची परिचय झाला. त्यानेच दि. 18 मार्च रोजी रात्री 11 वाजता मुलीला पळवून नेल्याचा पालकांना संशय आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बसू ड्रायव्हरवर गुन्हा नोंद झाला असून तपास पोहेकाँ कांबळे करीत आहेत.

बेदम मारहाणीत शेतकरी जखमी, दोघांवर गुन्हा

पळासनेर (ता. शिरपूर) येथे शेतकर्‍यासह मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत नरेंद्रसिंग जगतसिंग गिरासे (वय 58 रा. पळासनेर) या शेतकर्‍याने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या शेतात गायी घुसल्याने, त्या घरी नेवून बांधून ठेवत जा, असे सांगितले. त्याचा राग येवून कान्हा जसा वारण याने गिरासे यांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. तसेच कान्हासह जसा जिवन चारण या दोघांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गिरासे यांनी शिरपूर तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना शिरसाठ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या