Friday, April 26, 2024
Homeनगरकार्यालयात घुसून महिला ग्रामसेवकास मारहाण

कार्यालयात घुसून महिला ग्रामसेवकास मारहाण

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कापरेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसून महिला ग्रामसेवकास मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघा जणांवर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेने निषेध केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापरेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ग्रामसेविका म्हणून अरुणा भगवान गलांडे या कार्यरत आहेत. 31 डिसेंबर या दिवशी श्रीमती गलांडे या नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत होत्या. त्यावेळी गावामधील संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड हे दोघे जण आले आणि तुम्ही आम्हाला नेहमी त्रास का देता असे म्हणत अरुणा गलांडे यांना त्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे फाडली . त्यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सोडवले.

या घटनेनंतर ग्रामसेविका अरुणा गलांडे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमधील याबाबत लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून एक जानेवारी या दिवशी , संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड यांच्याविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याचा तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या