Friday, May 10, 2024
HomeनाशिकVideo : भुयारी मार्गात पाणी; रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू

Video : भुयारी मार्गात पाणी; रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

नांदगाव शहरातील नवीन वस्ती येथील स्वाती रवींद्र शिंदे (३३) (Swati Shinde) यांचा रेल्वे रूळ ओलांडताना महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या (Maharashtra Express) धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, नांदगाव शहरातील ग्रामदैवत एकवीस देवीच्या दर्शनासाठी स्वाती शिंदे जात होत्या. भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे त्यांनी रेल्वे रुळावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत संतप्त नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन हाय हाय, रेल्वे व नगरपालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा घोषणा देत रेल्वे स्थानकावर मोर्चा काढण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या