Saturday, April 27, 2024
Homeनाशिककरोनाचे उल्लंघन करत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची परीक्षा

करोनाचे उल्लंघन करत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना Corona विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात सतर्कता म्हणून नियम पाळणे बंधनकारक केलेले असताना पोलीसच हे नियम पाळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. आडगाव नाका येथील पोलीस चौकीवर Adgaon Naka Police Station मास्क न घालताच Without Mask पोलीस विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांची परीक्षा without helmet motorcyclist Examination घेण्यासाठी त्यांना अडवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक नियम सक्ती करतानाच दुसर्‍या मोठ्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाल्याने आता पोलीस आयुक्त यावर काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

वाहतूक शाखेतर्फे शहरात हेल्मेटसक्ती करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये 15 ऑगस्टपासून हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही अशी नो हेल्मेट, नो पेट्रोल ही मोहीम, त्यानंतर विनाहेल्मेट असणार्‍या नागरिकांसाठी दोन तासांचे समुपदेशन मोहीम राबवण्यात आली. जवळपास पाच हजार नागरिकांचे समुपदेशन यात करण्यात आले. त्यानंतर नो हेल्मेट, नो को-ऑपरेशन ही मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, मोठे एकात्मिक बाजार, चित्रपटगृहे आदी ठिकाणी मालमत्ता अधिकारी नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली.

तसेच सध्या शहरात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवास करत असल्यास पोलीस त्याला पकडून त्याचे समुपदेशन करून त्याची 10 मार्कांची परीक्षा घेत आहेत. त्यात पास झाला तरच त्याचे वाहन त्याला मिळत आहे. मात्र हे सर्व करत असताना पोलिसांनीदेखील नियमांचे पालन करावे, असा सूर नागरिकांमधून निघताना दिसत आहे. संबंधित नवीन आडगाव नाका केंद्रावरून अशा तक्रारी नेहमीच येत असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या