Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याखात्यात पैसे नसले तरी 10,000 रुपये काढा

खात्यात पैसे नसले तरी 10,000 रुपये काढा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रधानमंत्री जनधन योजनेंअंतर्गत खात्यात शून्य शिल्लक असली तरी गरजेच्या वेळी 10,000 रुपये काढता येतील, अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ठराविक काळात रक्कम परत केल्यास व्याज लागणार नाही. मात्र मुदतीनंतर रक्कम न भरल्यास ठरावीक व्याज द्यावे लागणार आहे.

- Advertisement -

देशातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने नऊ वर्षापुर्वी 15 ऑगस्ट 2014 ला ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ सुरू केली. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरिबातील गरीब आर्थिक कक्षेत आले आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी सुरू केली होती. 2014 मध्ये मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याची घोषणा केली होती. त्यामुळे आता गरजेच्या वेळी कोणाकडे हात पसरण्याची वेळ खातेदारांवर येणार नाही.

देशात गेल्या एप्रिल 2023 पर्यंत या योजनेत एकूण 48.70 कोटी लोकांनी खाती उघडली आहेत. आता त्या सर्वांंना 10 हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध झाली आहेप्रधानमंत्री जनधन योजनेत खातेदाराला सरकारकडून 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळतो. म्हणजे खात्यात शून्य रक्कम शिल्लक राहिली असेल तरीही तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. अशा स्थितीत जनधन योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर यासाठी काही अटी आहेत. खाते किमान सहा महिने सक्रिय असले पाहिजे. कुटुंबातील कमावत्या सदस्याला 10,000 दिले जातील. त्यात महिलांना प्राधान्य दिले जाईल. खात्यात सतत पैसे जमा होत राहिले पाहिजेत.खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

आरबीआयच्या निर्देशानुसार इतर कोणत्याही बँकेत/शाखेत खाते नसावे. े 18 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना ही सुविधा मिळते. या व्यतीरीक्त रुपे कार्ड घेतल्यास अपघात विम्याचही लाभ मिळत आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेवर, तुम्हाला दररोज व्याज द्यावे लागेल. विशेष म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा हेदेखील एक प्रकारचे कर्ज आहे. यापूर्वी पंतप्रधान जनधन खात्यात 5,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात असे. आता ती 10,000 रुपये करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या