Saturday, April 27, 2024
Homeजळगावभालचंद्र नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्या !

भालचंद्र नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्या !

रावेर|प्रतिनिधी Raver

-कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीत बंजारा समाजाच्या स्त्रीयाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल रावेरात बंजारा समाज बांधवानी तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देऊन भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

ज्ञानपीठाचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हि कादंबरी सध्या वादात सापडली आहे.राज्यात त्यांच्या या कादंबरीने बाजारांसमाजाच्या महिलांबद्दल आक्षेपार्ह वर्णन केलेलं असल्याने,ठिकठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.शुक्रवारी रावेरात तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या विजय पवार,रमेश राठोड,मधुकर पवार,महेंद्र पवार,मानसी पवार,लालचंद पवार,विश्वास जाधव,प्रवीण पवार,नरसिंग राठोड,नंदलाल पवार राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे तालुका अध्यक्ष सुरेश पवार,गणेश पवार,श्याम पवार,प्रकाश राठोड,अनिल राठोड,अनिल पवार,सिंधू पवार,सीमा मधुकर पवार,सीमा शाम पवार,ममता राठोड,वैशाली राठोड,मामिता पवार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या