Friday, April 26, 2024
Homeनाशिकजादूटोण्याचा प्रकार उघड; भोंदूबाबा फरार

जादूटोण्याचा प्रकार उघड; भोंदूबाबा फरार

नवीन नाशिक । प्रतिनिधी

पवन नगर स्टेडियम येथील मनपाच्या जागेत असलेल्या सुलभ शौचालयाच्या वर एका रूममध्ये 4 ते 5 लाख रुपये किमतीच्या दोन हजाराच्या नकली नोटा तसेच दोन काळ्या रंगाच्या कोंबड्या, अंडी, भगवे वस्त्र, शंख, मोहिनी वनस्पती यासह जादूटोण्याच्या वस्तू आढळून आल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते भगवान मराठे यांनी उघडकीस आणला.

- Advertisement -

यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र याठिकाणी वास्तव्यास असणारा भोंदू बाबा फरार असल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून या खोलीमध्ये रात्रीच्या वेळी काही नागरिकांना बोलावून तंत्र मंत्राद्वारे पूजा विधिचा देखावा मांडून भोंदूगिरीचा तसेच जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी जादुटोण्याच्या नावाखाली कोणाशी फसवणूक झाली आहे की काय याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

सदर प्रकाराबद्दल समक्ष पाहणी केली असता संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराकडे स्पष्टीकरण मागितल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

डॉ मयूर पाटील, विभागीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या