Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र‘डोळा मारणं, फ्लाईंग किस करणं’ लैगिंक छळच

‘डोळा मारणं, फ्लाईंग किस करणं’ लैगिंक छळच

मुंबई –

डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे म्हणजेच लैंगिक छळ असल्याचे मुंबईतील एका न्यायालयाने

- Advertisement -

म्हटले आहे. असे करणार्‍या एका 20 वर्षीय आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 10 हजार रुपये पीडित मुलीला देण्यास सांगितले आहेत.

लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा म्हणजेच पोस्को अंतर्गत न्यायालयानेे हा निकाल दिला आहे.

14 वर्षीय पीडित मुलगी 29 फेब्रुवारी 2020 ला आपल्या बहिणीसोबत घराबाहेर जात असताना आरोपीने तिला डोळा मारला आणि फ्लाईंग किस केला. आरोपीच्या कृत्यामुळे 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारचं कृत्य अनेकदा केले होते. मुलीने याबाबत तिच्या आईला सांगितले होते. पीडित तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला समजही दिली होती. मात्र त्याच्या कृतीत कोणताही बदल न झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दिली.

आरोपीने कोर्टात पीडित मुलीच्या बहिणीसोबत 500 रुपयांची पैज लागल्याचे कारण पुढे करत असे कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र पैज लावल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने पीडित तरुणीच्या बाजूने निर्णय देत आरोपीला शिक्षा सुनावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या