Tuesday, April 23, 2024
Homeजळगावपत्नीची हत्या अन् पतीची आत्महत्या

पत्नीची हत्या अन् पतीची आत्महत्या

चाळीसगांव । chalisgaon

दुसरीही मुलगीचं पोटी जन्माला आली म्हणून हताश झालेल्या नवर्‍याने दारुच्या नशेत पत्नीची हत्या करत स्वत:ही रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी शहरातील जुना करगांव रोड परिसरातील जय गणेश नगर भागात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहरातील धुळे आणि जळगांव रेल्वे लाईनच्या मध्ये असलेल्या जय गणेश नगर मध्ये राहत असलेल्या सूरज दिलीप कुर्‍हाडे (वय 28) आणि रेश्मा सूरज कुर्‍हाडे (वय 24) यांचा संसार थाटलेला होता,सूरज व रेश्मा हे दोघेही नवरा बायको खड्डे खोदण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह भागवित होते.त्यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे. त्यातच सूरजला दारूचे व्यसन होते. दारुच्या व्यसनामुळे नवरा बायको मध्ये वाद होत होते.रेश्माचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून ती बाळांतपणासाठी माहेरी गेलेली होती.

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी झाल्याने सूरजच्या मनात दु:ख होते .दुसरी मुलगी तीन महिन्याची झाल्यानंतर दि.25 नोव्हेंबर रोजी सूरज हा पत्नीला घेण्यासाठी जुनोवणे ता.धुळे येथे गेला होता .दोन दिवस सासुरवाडीला राहिल्यानंतर परवा म्हणजे दि.28 नोव्हेंबर रेाजी पत्नीला चाळीसगांव येथे घेऊन आला.आज पहाटे लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहत असलेले नातेवाईक त्यांच्या घरात चौकशीसाठी गेले असतांना त्यांना रेश्मा मयत स्थितीत आढळून आली.तिच्या डोक्यावर कुर्‍हाडीचे वार झालेले असावेत रक्तस्त्रावात पडलेली होती.

नातेवाईकांनी रेशमाच्या माहेरी ही घटना कळविली, सर्व नातेवाईक घटनास्थळी जमा झालेले असतांना सूरज मात्र त्याठिकाणी उपस्थित नव्हता. त्याचवेळी सूरजच्या घरापासून जवळचं असलेल्या धुळे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली एका इसमाने आत्महत्या केल्याची वार्ता पसरताच सर्व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तो मृत्यदेह हा सूरजचा असल्याचे आढळून आले. मयत रेशमाचा भाऊ प्रताप शातांराम गायकवाड याने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मयत सूरजच्या विरोधात कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या