Friday, April 26, 2024
Homeनाशिकपत्नी सरपंच अन् पती उपसरपंच

पत्नी सरपंच अन् पती उपसरपंच

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक तालुक्यातील विंचुरी गवळी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच अशी दोन्ही पदे एकाच दांपत्याला मिळाल्याचा योगायोग आज जुळून आला. याठिकाणी आरक्षणामुळे आज (दि.12) अनिता विजय रिकामे यांची सरपंच पदी आणि त्यांचे पती विजय दत्तात्रय रिकामे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर सदस्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisement -

विंचुरी गवळी ता. नाशिक येथील ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंत पदाची निवडणुक प्रक्रिया निवडणुक अधिकारी आर. डी. शिरोडे यांच्या उपस्थित झाली. यात प्रथम सरपंच पदाची प्रक्रिया होऊन याकरिता अनिता विजय रिकामे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे आणि तो वैध ठरल्यानंतर त्याची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर उपसरपंच पदाची निवडणुक प्रक्रियेत देखील विजय रिकामे यांचा एकमेव अर्ज आला.

यामुळे त्यांची देखील निवडणुक अधिकार्‍यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अशाप्रकारे विंचुरी गवळी ग्रामपंचायतीचा कारभार एकाच दांपत्यांकडे गेला आहे. विजय रिकामे यांना राजकिय वारसा असुन त्यांचे वडील दत्तात्रय रिकामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच, नाशिक तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा खरेदी विक्री संघ अशा ठिकाणी संचालक व पदाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. त्यांच्या निवडीनंतर याठिकाणी मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणुक अधिकार्‍यांनी या दांपत्याचे स्वागत केल्यानंतर ग्रामस्थ व सदस्यांकडुन निवडीचे स्वागत करण्यात आले.

या निवडणुक प्रक्रिये प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य दत्तात्रय काळे, फुल्याबाई कुवर, चंद्रकला गवळी, दत्तात्रय कुवर, उत्तमराव रिकामे, मनिषा जाधव, लता रिकामे, ग्राम सेवक शरद आव्हाड, अशोक रिकामे, माजी सरपंच संजय पवार, मधुकर रिकामे, फकिरराव शिंदे, गजानन शेलार, दत्तात्रय वाघचौरे, भाऊसाहेब गवळी, बाळासाहेब रिकामे, वसंत रिकामे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या